"रयत" मध्ये सचोटीने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला संधी*


"रयत" मध्ये सचोटीने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला संधी*

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी

तुकाराम कन्हेरकर (विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था) रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांना निरोप व शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम विद्यालयात पार पडला.

प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांना रयत शिक्षण संस्थेने उत्तर विभागातील नाशिक,धुळे, नंदुरबार ,अहमदनगर, बीड या  जिल्ह्यांचे इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक केलेली आहे त्यांनी इन्स्पेक्टर पदाचा नुकताच पदभार स्वीकारला . श्रीगोंद्यातील महादजी शिंदे विद्यालयाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्याचा व निरोप देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सत्कराला  उत्तर देताना ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वसा व वारसा सातत्याने जपल्यामुळे तसेच  विद्यार्थीनिष्ठा व सतत सचोटीने प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम केल्यामुळे आपल्याला ही संधी मिळाली आहे. या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेची अधिक प्रभावीपणे सेवा करता येईल तसेच सर्वसामान्य रयतसेवक आणि संस्था यातील दुवा म्हणून काम करण्याची भूमिका पार पाडणार आहे.यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बाळासाहेब जाधव दिलीप भुजबळ शिक्षिका सौ  कुंदा निद्रे, ग्रंथपाल धनंजय देशमुख, यांनी  आपल्या मनोगतातून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत, कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप भुजबळ यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विलास दरेकर व  सूत्रसंचालन सचिन झगडे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News