चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सन्मान


चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सन्मान

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी-विजय एस भोसले 

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य कृषी विकास

प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून राहूरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील विविध शाळांतील इयत्ता १०वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा  सन्मान करण्यात आला.

  चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भांड म्हणाले, शिक्षकांच्या समर्पण भावनेतील शिकवणीतून विद्यार्थ्यांची जडणघडण होते. त्यातूनच भारताचा भावी सक्षम आणि सुसंस्कारित नागरिक निर्माण होतो.अनेक गुणवंत विद्यार्थी परीक्षेत यश मिळवून आपल्या गुरूंच्या ऋणातून उतराई होतात.

त्यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक परिश्रमाला यशाचे फळ मिळवून देणार्‍या या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आजच्या शिक्षकदिनी करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक आयुष्यात त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना ही शाबासकीची थाप असल्याचे भांड यांनी सांगितले.

    म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले, चैतन्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेश भांड यांनी सामाजिक व्यासपीठ उभारून गुणवंत विद्यार्थ्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी, महिला, कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचार्‍यांना सतत मानसन्मान देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम भांड यांनी केले आहे. कार्यक्रमास मुंबई येथील सुनील भालेराव, आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, डॉ.भागवत वीर, प्रा. उर्‍हे, वैभव गाडे,  पत्रकार वसंत झावरे, हेमंत मिसाळ, शिवाजी घाडगे, कुणाल पाटील, शुभम पाटील, मयूर अडागळे, अवदेश कुमार, भारत साळवे, सोमा भागवत आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित  होते., प्रास्तविक प्रतिष्ठानचे सचिव संदीप पंडित यांनी तर सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौरव भांड, सुमेध भांड,  ऋषी राऊत, भारत भांड, सुभाष कांबळे, प्रतीक जाधव आदींनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News