पौष्टिक आहार आणि योग्य प्रकारचे पोषण केल्यास विद्यार्थ्यांमध्ये क्षमता वाढून त्यांची गुणवत्ता सिध्द करण्यास मदत होते - रेणुका कोल्हे


पौष्टिक आहार आणि योग्य प्रकारचे पोषण केल्यास विद्यार्थ्यांमध्ये क्षमता वाढून त्यांची गुणवत्ता सिध्द करण्यास मदत होते - रेणुका कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव - सुदृढ शरीर संपदा आणि प्रसन्न मनाने माणुस कोणत्याही संकटावर मात करू शकतो, त्याकरीता सर्वांनी पौष्टिक आहाराला प्राधान्य दिलेे पाहिजे. विदयार्थी हे देशाचे भविष्य असुन पौष्टिक आहार आणि योग्य प्रकारचे पोषण केल्यास विद्यार्थ्यांमध्ये क्षमता वाढून त्यांची गुणवत्ता सिध्द करण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ रेणुका विवेक कोल्हे यांनी केले.

१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय आहार सप्ताह म्हणून देशभरात साजरा होत आहे. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्व पटवून देण्यासाठी व्यवस्थापनाने दोनदिवसीय वेबिनारचे गुगलमीट प्रणालीव्दारे आयोजन केले होते. ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोपरगावचे प्रसिध्द सर्जन डाॅ राजेश माळी आणि बालरोग तज्ञ डाॅ मयुर जोर्वेकर यांनी सहभाग नोंदवला. डाॕ. माळी यांनी "आहरावारील नियंत्रण" तसेच डाॕ. जोर्वेकर यांनी " नियंत्रित आणि  संतुलित आहार " या विषयावर मार्गदर्शन केले.

आजच्या कोरोना परिस्थितीच्या पाश्वभूमीवर करावयाचा आहार आणि बुध्दीमता वाढीसाठी बालवयात दयावयाचा पौष्टिक आहार कशा  पध्दतीने असावा यावर विशेष मार्गदर्शन केले. चुकीचा आहार टाळून विद्यार्थ्यांच्या बौध्दीक वाढीसाठीच्या आहाराच्या सवयी आत्मसात कराव्यात. तसेच आरोग्य वर्धक आहारामुळे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते, त्यामुळे बौध्दीक क्षमतेत वाढ होत असल्याचे मार्गदर्शन डाॅ माळी व डाॅ जोवेंकर यांनी केले. राष्ट्रीय आहार सप्ताह निमित्त दि. २ सप्टेंबर रोजी इ. ०७ ते ८ वी तसेच दि. ०३ सप्टेंबर रोजी इ. ०९ व १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी हे वेबिनारचे सञ आयोजित केले होते. 

 या सप्ताहा निमित्त आहार विषयक इतर उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून 7 सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आहाराचे महत्व पटवून देणार असल्याचे प्राचार्य जाधव यांनी सांगितले. ॲकेडमीक हेड प्रा हरिभाउ नळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिक्षम घेतले. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने डाॅ राजेश माळी आणि डाॅ मयुर जोर्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News