दौंडच्या माजी तहसीलदांरावर ऍट्रॉसिटी अंतर्गत खटला दाखल करण्याची मागणी..


दौंडच्या माजी तहसीलदांरावर ऍट्रॉसिटी अंतर्गत खटला दाखल करण्याची मागणी..

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी  :

दौंड तालुक्यातील वाळकी या ठिकाणी गावठाणा लगत महार वतनाच्या काही जमिनी  आहेत या जमिनीतून पलीकडे जाण्यासाठी उच्चवर्णीय लोकांनी त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी दलितांच्या जागेमधून रस्त्याची सोय व्हावी म्हणून माजी तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे  मागणी केली होती. त्यावेळी दिघे यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून महार वतनाच्या जमिनीतून चक्क 35 फुटांचा रस्ता करण्याचे आदेश दिलेले आहेत. हा खूप मोठा चुकीचा व दलितांवर अन्यायाचा निर्णय आहे. सदर प्रकरणात माजी तहसीलदार यांनी आर्थिक देवाणघेवाण करून नियमबाह्य पद्धतीने आदेश दिलेले आहेत असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने दिघे यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत खटला दाखल करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सध्याचे तहसीलदार व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.       

 तसेच सदर रस्त्याच्या ठिकाणी येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकास जर तोडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात दंगली घडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे सदर प्रकरणी शासनाने लक्ष घालून त्वरित निर्णय घ्यावा व स्मारक तोडण्याचा विचार रद्द करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यास बसावे लागेल असा इशाराही सदर निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी माजी तहसिलदार दिघे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.       

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, दौंड शहराध्यक्ष अनिकेत मिसाळ, रमेश तांबे, किरण लोंढे, राजेश ओहोळ, जयदीप बगाडे, प्रशांत भालेराव, सागर पवार, अमोल भालेराव, निलेश भालेराव, अमोल वाघमारे, प्रीतम पवार, प्रशांत शिंदे, हिरामण जगताप, दत्ता चव्हाण, दादासाहेब कदम, अनिकेत जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News