विट्ठल होले पुणे
दौंड प्रतिनिधी -- गोपाळवाडी येथील संदीप जाधव या तरुणाने वाढदिवसाचा इतर खर्च टाळून गावातील 10 विच्या वर्गात चांगल्या मार्काने पास झालेल्या सर्व विद्यार्थ्याचा पोलीस पाटील वर्षाताई लोणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गुणगौरव केला आहे,सध्या रस्त्यावर गाड्या उभ्या करून त्यावर केक ठेवून फटाकडे वाजवत तलवारीने केक कापण्याची तरुणांमध्ये होड लागली आहे, अशा टारगट तरुणांना पोलिसांचा प्रसाद मिळाला आहे, परंतू संदिप जाधव या तरुणाने सर्व गोष्टींना फाटा देत तरुणांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे,यावेळी गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले हे कोरिंटाईन असल्यामुळे त्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या व इतर तरुणांना एक वेगळा मार्ग दाखवून स्तुत्य उपक्रम राबवून केलेल्या कार्याबद्दल संदिप जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.हा कार्यक्रम शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रणित टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित विद्यार्थी गुण गौरव पुरस्कार वितरण सोहळा या पद्धतीने साजरा केला,यावेळी शिवभक्त संदिप जाधव (उपाध्यक्ष शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा पुरस्कार सोहळा सोशल डिस्टेण्टिंगचे पालन करत संपन्न झाला,यावेळी सौ वर्षा ताई उमेश लोणकर (पोलिस पाटिल गोपाळवाड़ी) प्रमुख उपस्थितीसागर दादा शेलार (स्वराज्य रक्षक संभाजी फेम्) गोपाळवाड़ी युवा मंच,जिजामाता विद्यालयाचे शिक्षक गणेश लोणकर सर,नानवीज विद्यालयाचे शिवाजी होले सर सर्व विद्यार्थी आणि संदीप जाधव यांचे सर्व सहकारी मित्र उपस्थित होते.