दौंड पंचायत समितीचे अधिकारीच कोरोना पॉझिटीव्ह आल्याने पंचायत समितीत शुकशुकाट,सावधान इशारा देणारा लावला फलक


दौंड पंचायत समितीचे अधिकारीच कोरोना पॉझिटीव्ह आल्याने पंचायत समितीत शुकशुकाट,सावधान इशारा देणारा लावला फलक

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे,ग्रामीण भागातील छोट्या छोट्या गावात कोरोना पोहचला आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे,तरीही लोक गांभीर्याने दखल घेत नाहीत, आरोग्य अधिकारी कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत,त्यात दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी च कोरोना बाधीत झाल्यामुळे कायम वर्दळ असणाऱ्या  दौंड पंचायत समितीत पहिल्यांदा शुकशुकाट पहायला मिळाला आहे, तेथील अधिकाऱ्यांनी सावधानतेचा इशारा देणारा फलक बाहेर लावला आहे. आतातरी जनतेने विनाकारण बाहेर जाऊ नये, सतत मास्क वापरावे,हात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या,अफवांवर विश्वास ठेवू नये,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन डॉ अशोक राजगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News