कोपरगाव - पुणे येथील टिव्ही 9 चे प्रत्रकार पांडुरंग रायकर हे कोरोना आजारी असताना वेळेवर वैदयकिय उपचार न मिळाल्याने बुधवारी पहाटे पुणे येथे त्यांचे निधन झाले.
पत्रकार पांडुरंग रायकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असताना कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल करून घेण्यास विलंब केल्याने व नंतर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये योग्य सुविधा न मिळाल्याने बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यु झाला
त्यांच्या मृत्यस कारणीभूत असलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारावाई करावी या मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार व कोपरगाव तालुका पत्रकार संघ यांनी केली असुन याबाबतचे निवेदन मा.तहसिलदार साहेब कोपरगाव यांना दिले असुन, नायब तहसिलदार योगेश कोतवाल यांनी ते स्विकारले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका जनार्दन जगताप संजय भवर अध्यक्ष मनिष जाधव, रविंद्र जगताप, अक्षय काळे, पत्रकार बिपीन गायकवाड, पत्रकार विजय कापसे, पत्रकार श्रीकांत नरोडे हे उपस्थित होते.