न्यायालये तातडीने सुरू करावीत - इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्स संघटनेची मागणी


न्यायालये तातडीने सुरू करावीत - इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्स संघटनेची मागणी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद  पठाण

कोरोना महामारीच्या काळात गेल्या ५ - ६ महिन्यांपासून न्यायालये बंद आहेत. नागरिकांना उपचारासासाठी इस्पितळांची जेव्हढी गरज आहे, तेव्हढीच न्याय मिळण्यासाठी न्यायालयांची गरज असल्याने न्यायालये तातडीने सुरू करावीत, अशी मागणी इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सच्या शेवगाव तालुका शाखेने केली आहे.

या बाबतचे निवेदन तहसिलदार अर्चना पागिरे - भाकड यांच्या मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेचे ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष लांडे यांनी दिली. निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना लॉकडाऊन नंतर अनलॉक ४ सुरू झाल्यानंतर विविध संस्थाना नियम पाळत त्यांचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे.  सगळी दारे बंद झाल्यावर पक्षकार न्यायालयाचे दार ठोठावतात.  अशा लाखो पक्षकारांचे जीवन मरणाचे अनेक प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहेत. परंतु न्यायालयांचे कामकाज सुरू करण्यास परवानगी अद्यापही न दिल्याने न्यायासाठी प्रतिक्षेत असलेल्या पक्षकारांची तसेच वकिलांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.  दि. १ सप्टेंबर २०२० पासून १७ दिवस तातडीचे प्रकरणे चालतील असा आदेश आला असला तरी त्याचा फक्त जामिन अर्ज असाच त्याचा अर्थ घेतला जात आहे. दिवाणी स्वरूपाच्या व नोकरी संदर्भातील तातडीच्या प्रकणाच्या व्याख्या पातळ झाल्या आहेत.

 न्यायालये बंद असल्याने वकिलांची बिकट स्थिती झाली आहे. त्यामुळे, न्यायालयांचे काम नियमीत पुर्ण वेळ सुरू करावे तसेच न्यायालये बंद असेपर्यंत राज्यशासनाने पुर्वलक्षीप्रभावाने सर्व वकिलांना दरमहा १५ हजार रूपये सन्मानधन द्यावे, वकिलांना कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान देऊन ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळावे अन्यथा ५० लाखांचे सानुग्रह अनुदान द्यावे, कोव्हिड १९ संक्रमित वकिल व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या उपचारासाठी दोन लाखांची मदत मिळावी, कोव्हिड टेस्ट प्रत्येक न्यायालयात उपलब्ध करून द्याव्यात, आरबीआयने जाहिर केलेली कर्जाचे हप्ते न भरण्याची सोय सर्व वकिलांना न्यायालये पुर्वरत सुरू होईपर्यंत लागू करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर ॲड. लांडेढ यांच्यासह ॲड. रामदास बुधवंत,   ॲड. बाळासाहेब शिंदे, ॲड. हरिभाऊ गाडेकर, ॲड. अमोल वेलदे, ॲड. दादासाहेब शेळके, ॲड. कार्तिक कमाने, ॲड. मिनानाथ देहाडराय, ॲड. मुनाफ शेख, ॲड. विशाल लांडे, ॲड. रघुनाथ राठी, ॲड. चौधरी, ॲड. अनिरूद्ध महाजन, ॲड. गणेश ताठे, ॲड. विनायक आहेर, ॲड. राधाकिसन गरड, ॲड. संतोष काकडे आदींसह अनेक वकिलांच्या सह्या आहेत.

-----------------------------------------------

( दि. ४ सप्टेंबर २०२० )

जाहिरात
Search
विडिओ
Recent News