माळीवाड्यातील टेऊराम मंदिराचा जादा आलेला कर माफ!! नगरसेवक बाळासाहेब बोराटे व मंगलताई लोखंडे यांच्या प्रयत्नाला यश


माळीवाड्यातील टेऊराम मंदिराचा जादा आलेला कर माफ!! नगरसेवक बाळासाहेब बोराटे व मंगलताई लोखंडे यांच्या प्रयत्नाला यश

माळीवाडा येथील टेऊराम मंदिर ट्रस्टला मनपाने  कर व त्यावरील शास्ती रु. 2 लाख 26 हजार रुपयांचा संकलित कर प्रभागाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व नगरसेविका मंगलताई लोखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे माफ करण्यात आला. याबाबतचे पत्र मंदिराच्या ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी परेश लोखंडे, अ‍ॅड.विजयकुमार  मुनोत, श्रीचंद तलरेजा, चंदूमल तलरेजा, मुकेश चुग, प्रकाश बठेजा, प्रदीप हिरानंदानी, अमरलाल तलरेजा, गोविंद तलरेजा, विशाल वालकर आदी. (छाया : राजु खरपुडे ) 

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) माळीवाडा येथील टेऊराम मंदिर ट्रस्टला महानगरपालिकेने  वाणिज्य प्रमाणे आकारलेला कर व त्यावर लावलेली शास्ती रु. 2 लाख 26 हजार रुपयांचा संकलित कर प्रभागाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व नगरसेविका मंगलताई लोखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे माफ करण्यात आला. याबाबतचे पत्र मंदिराच्या ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी परेश लोखंडे, अ‍ॅड.विजयकुमार  मुनोत, श्रीचंद तलरेजा, चंदूमल तलरेजा, मुकेश चुग, प्रकाश बठेजा, प्रदीप हिरानंदानी, अमरलाल तलरेजा, गोविंद तलरेजा, विशाल वालकर आदी उपस्थित होते.यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, माळीवाडा येथील स्वामी टेउराम मंदिर ट्रस्ट येथे फक्त धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा चालू असते. त्यांचा व्यवसायिक वापर नसल्याने मनपाने चुकीच्या पद्धतीने संकलित कर आकारण्यात आला होता.  वास्तविक पाहता मनपा अधिनियमन 132(ब) 1 प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही. याबाबत आम्ही मनपाकडे कायदेशिररित्या सातत्याने पाठपुरावा करुन चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे नगरमधील कोणतेही धार्मिकस्थळ जसे मंदिर, मस्ज़िद, गुरुद्वारा, चर्च आदिंचा वापर जर व्यवसायिक होत नसले तर त्यांचाही  कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.

     याप्रसंगी अ‍ॅड.विजयकुमार मुनोत म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यवसायिक होत नसले तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात. परंतु टेऊराम मंदिर ट्रस्टला व्यावसायिक दराने मनपाने कर व शास्ती आकारली होती. याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत सांगितले, त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करुन हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यापुढील काळात मंदिर नियमाप्रमाणे नियमित कर भरले, असे सांगून याकामी मदत केल्याबद्दल श्री.बोराटे व मंगलताई लोखंडे यांचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेविका मंगलताई लोखंडे यांनी प्रभागातील मुलभूत समस्यांबरोबरच इतरही कामे आम्ही तत्परतेने करत आहोत. टेऊराम मंदिराचा कराबाबतचा प्रश्‍न मार्गी लागल्याचे समाधान आहे. पुढील काळातही अशाच पद्धतीने कार्यरत राहू, असे सांगितले.

     मंदिरचे श्रीचंद तलरेजा यांनी बोराटे व लोखंडे यांचा सत्कार करुन आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News