कोपरगाव शहराच्या 42 कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे थर्ड पार्टी आँडीट करावे !!स्वप्निल निखाडे


कोपरगाव शहराच्या 42 कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे थर्ड पार्टी आँडीट करावे !!स्वप्निल निखाडे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव शहराच्या 42 कोटी रुपये खर्चाचा पाणीपुरवठा योजनेचे थर्ड पार्टी ऑडीट करण्याची पाणी पुरवठा सभापती निखाडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली आहे .

कोपरगाव शहरवासीयांसाठी असलेली ४२ कोटी रूपये  खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामासंदर्भात नगरपालिकेची माहिती आणि योजनेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती याबाबत विसंगती असल्याने या योजनेची चौकशी करून प्रकल्प अहवालानुसार योजनेचे काम झाले नसल्याने शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला आहे, या प्रकाराची तातडीने चौकशी करावी,तसेच या योजनेचे थर्ड पार्टी आॅडीट करण्यात यावे, अशी मागणी  नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे सभापती स्वप्नील निखाडे यांनी केली आहे.

      यु आय डी एस एस एम टी योजनेअंतर्गत कोपरगाव शहर सुधारीत पाणीपुरवठा मंजुर करण्यात आली. सुमारे ४२ कोटी रूपये व वाढीव ७.५० कोटी अशी एकुण ४९.५० कोटी खर्चाच्या या योजनेच्या सदयस्थितीबाबत विसंगती असुन अनेक त्रुटी दिसुन येत आहे. सदर योजना कार्यान्वीत झालेली नाही तरीही या योजनेचे बीले अदा करण्यात आले असल्याने पैशाचा मोठा अपव्यय झाल्याचे दिसत आहे. सदर योजना ही पाईपलाईन आराखडयाप्रमाणे झालेली नसल्याने १६ एमएलडी प्रमाणे पाणीपुरवठा होत नाही, योजनेसाठी ७ झोन असून सदयस्थितीत या सात झोनमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाही. वितरीकांची जोडणी झालेली नाही, व्हाॅल टाकलेले नाही. दोन नवीन पंपाची आवश्यकता आहे, परंतु प्रत्यक्षात पंप कार्यान्वित नाही. मोठया जलकुंभाची आवश्यकता असून इतर जलकुंभात पाणी जात नसल्याने सातही झोनला पुर्णक्षमतेने पाणी पुरवठा होत नाही. त्याचप्रमाणे १६ एमएलडी पाणी पुरवठा करणारी वितरीका कार्यक्षम नाही, पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन योग्य आणि तांञिकदृष्टया  नसल्यामुळे तळयातील पाणीसाठा आणि वेग यावर परिणाम होणार आहे. जुन्या योजनेपेक्षा नवीन योजनेप्रमाणे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. निविदेमधील तरतुदीप्रमाणे वाॅटर रिडींग मीटर नागरीकांना दिलेले नाही. योजनेतील मंजुर पाईप हे प्रत्यक्षात टाकलेले नाही. अशा अनेक प्रकारच्या त्रुटी या योजनेत दिसून येत असल्याने शासनाकडून आलेल्या या पैशाचा योग्य विनियोग झालेला नाही. परंतु कागदपत्राद्वारे सदरची योजना पुर्ण झाल्याचे दाखवुन बीले अदा  केलेली आहे.

जनतेच्या जिव्हाळयाच्या असलेल्या या ज्वलंत प्रश्नी दिशाभुल केली जाते ही शहरातील नागरीकांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. सदर योजनेसंदर्भात अनेक त्रुटी असतांनाही नगरपालिकेने ठेकेदाराला पुर्णत्वाचा दाखला कसा दिला हा प्रश्न असुन घाईघाईने बीलेही अदा करण्यात आल्याबददल संशय निर्माण होत आहे. तसेच एवढ्या मोठ्या रकमेचा निधी खर्च करून नगरपालीका योजना पुर्ण करण्याचा दावा करीत आहे, परंतू नागरीकांना याचा फायदा होत नाही. त्यामुळे या योजनेचे थर्डपार्टी ऑडीट करावे, अशी मागणी श्री निखाडे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News