कोपरगावातील विस्थापित टपरीधारकांचे पुर्नवसन करावे !!श्नमिकराज संघटनेचे नगर परीषदेस निवेदन


कोपरगावातील विस्थापित टपरीधारकांचे पुर्नवसन करावे !!श्नमिकराज संघटनेचे नगर परीषदेस निवेदन

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरात दहावर्षा पूर्वी नगरपरीषदेने शहरातील रस्ते, चौक व इतर ठिकाणचे अतिक्रमण काढले होते. 

त्यातील विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी आपले पुर्नवसन व्हावे यासाठी नगरपरिषदेला वेळोवेळी निवेदन देउन पाठपुरावा केला आहे परंतु या गोष्टीला दहा वर्ष उलटुन गेले तरी नगर परीषदेने टपरीधारकांच्या पुर्नवसनबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही परंतू कोरोना महामारीच्या आगीत होरपळल्या नंतर तो प्रश्न आता ऐरणीवर आला असुन श्रमिकराज संघटनेने टपरीधारकांचे पुर्नवसन व्हावे या मागणीचे निवेदन नगर परीषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे .

दि. १०/१/२०११मध्ये कोपरगाव नगरपरीषदेने शहरातील अतिक्रमण काढले होते.त्यामध्ये टपरीधारकांचा समावेश मोठया प्रमाणात होता.त्यावेळी नगरपरीषदे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी फक्त आश्वासनेच दिल्याने विस्थापित टपरीधारकांचे व्यवसाय बंद झाले व देशोधडीला लागले काही जणांचे तर अक्षरशहा : प्रपंच उधवस्त झाले आहे.बरेच व्यवसायिक कोपरगाव सोडुन पोट भरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत व्यवसायाच्या भरवश्यावर बँका व पतसंस्थांची घेतलेले कर्ज स्वःताचे रहाते घर विकुन भरण्याची नामुष्की टपरीधारकांवर आली.काही विस्थापित आजही गावोगावी  भटकंती करुन आपला व कुटुंबाचा उदार निर्वाह करत आहेत.मुलांचे शिक्षण अपूर्ण राहील्याने ती आज बेरोजगार आहेत.तरी या सर्व बाबींचा विचार करून नगर परीषदेने सर्वसाधारण सभेत हा विषय मांडुन लवकरात -लवकर टपरीधारकांचे पुर्नवसन करावे असे या निवेदनात नमुद केले आहे , यावेळी माजी नराध्यक्ष मंगेश पाटील,तालुका अध्यक्ष अजय विघे,गणेश शिंदे,संघटक राहुल धिवर,सचिव गणपत पवार, बालाजी गोरडे हे प्राथमिक स्वरूपात उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News