कल्याण - विशाखापट्टणम हायवे न २२२ रोडच्या दोन्ही बाजूस काँक्रिटीकरणं रोड तसेच ओपन गटार मध्ये डिव्हायडर करणे बाबत चे निवेदन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिले


कल्याण - विशाखापट्टणम हायवे न २२२ रोडच्या दोन्ही बाजूस काँक्रिटीकरणं रोड तसेच ओपन गटार मध्ये डिव्हायडर करणे बाबत चे निवेदन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिले

नगर( प्रतिनिधी संजय सावंत) - कल्याण रोड परिसर हा दिवसेंदिवस वाढत असून येथील नागरिकांसाठी रस्त्यातून ये-जा करताना हायवे रास्ता अरुंद असल्याने अडथळा होत आहे  विशाखापट्टणम हायवे न २२२ हा शिवाजीनगर परिसर मधून गेलेला आहे .या परीसरात नागरिकांची वर्दळ नेहमी असते .पावसाळ्यात या रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते त्यामुळे ते पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात .त्यामुळे माजी आपणास विनंती आहे कि कल्याण  विशाखापट्टणम हायवे न २२२ येथे रास्ता चौपदरी करावा व आजू बाजूने सांडपाण्याची ओपन गटार व रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर करण्यात तसेच नेप्ती नाका ते-शिवाजीनगर ,शिवाजीनगर ते सीनानदी या ठिकाणी अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत यासाठी बायपास चौक ते शिवाजीनगर व शिवाजीनगर ते नेप्तीनाका चौक तसेच सीनानदीवर नवीन ब्रीज ( पूल ) करण्यात यावा. जेणेकरून रोडने वाहतूक कोंडी / अपघात या सर्वांचे प्रमाण कमी होईल तरी आपणास विनंती करतो कि आपण नागरिकांच्या हितासाठी व संरक्षणासाठी रास्ता चौपदरीकरणं सांडपाण्याची ओपन गटार ,मध्यभागी डिव्हायडर व नवीन पूल या मुख्य बाबीकडे लक्ष घालून त्वरित अमलात आणावी हि विनंती. यावेळी निवेदन देते वेळी शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर ,जिल्हा प्रमुख प्रा शशिकांत गाडे ,शहरप्रमुख दिलीप सातपुते आदी सह सर्व नगरसेवक उपस्थतीत होते 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News