सुपे येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन


सुपे येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन

राजश्री बनकर सासवड (प्रतिनिधी) 

पुरंदर तालुका हा अतिशय निसर्गरम्य परिसराने नटलेला असतानाच सुपे पानवडी काळदरी बांदलवाडी हा परिसर पूर्ण डोंगर व हिरवाईने नटलेला परिसर असून संपूर्ण डोंगर भाग अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो ह्या परिसरातील डोंगर भागाचे गणिजखौन उत्खनन करून मोठ मोठे पॉल्ट डेव्हलप करून त्याचे तुकडाबंदी पद्धतीने विक्री करण्याचा सपाटा सध्या पुरंदर मध्ये जोरदार सुरु असल्याचे पहावयास मिळते आहे.

          सुपे (ता पुरंदर) येथील डोंगर भागाचे बेकायदेशीरपणे गणिजखौन उत्खनन करून प्लॉट डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न  सुरू आहे. सुपे पानवडी काळदरी बांदलवाडी हा परिसर निसर्गाने अतिशय सुंदर असा बनवलेला असतानाच सह्याद्रीच्या पर्वतरांगा तील हा परिसर आहे. परंतु ह्या  परिसरातील डोंगर भाग भुईसपाट करण्याचा धडाका जोरदारपणे सुरु असल्याने निसर्गप्रेमींनी मात्र यावर निराशा व्यक्त केले.

      समुद्र सपाटी पासून सर्वात उंच असणारा पुरंदर किल्याचा परीसरात व त्या लगतचा भौगोलिक परिस्थिती व सुपे पासून ते काळदरी पर्यंत अतिशय निसर्गरम्य परिसर असल्याने त्याचबरोबर हिरवाई व परिसरातील बंधारे खळखळून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी निसर्गप्रेमी सध्या सुपे मार्गे काळदरी पर्यंत जात असतात.

               ..... या बाबत आधिकारी यांच्या कडुन उतखननाचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करु -

       -रुपाली सरनोबत तहसीलदार पुरंदर


जाहिरात
Search
विडिओ
Recent News