निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य सदस्यपदी निवृत्ती शेलार....


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य सदस्यपदी निवृत्ती शेलार....

अंकुश तुपे श्रीगोंदा/प्रतिनिधि,

श्रीगोंदा राष्ट्रीय वनीकरण आणि विकास बोर्ड वन व पर्यावरण भारत सरकार नवी दिल्लीचे सन्माननीय सदस्य व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी सन 2020 ते 2025 पर्यंत नूतन कार्यकारणी जाहीर केली आहे त्यामध्ये निवृत्ती शेलार जनता विद्यालय काष्टी या शिक्षकाची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. संरक्षण पर्यावरण संवर्धन व तत्संबंधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळीवर दखल घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सदस्यपदी शेलार यांची निवड झाली आहे या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत पंचवीस डॉक्टर पंचवीस कायदेपंडित विविध क्षेत्रातील प्रामाणिक काम करणारे 25 कार्यकर्ते प्राथमिक माध्यमिक प्राध्यापक या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर काम करीत असतात सन 2004 मध्ये महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार जनता विद्यालय काष्टी शाळेस मिळाला यात त्यांचे मोलाचे योगदान आहे इंडियन बहुजन टीचर असोशियन यांचा राज्य पातळीवरचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2008 मध्ये शेलार यांना मिळाला आहे या उपक्रमशील शिक्षक निवृत्ती तुकाराम शेलार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच दिलीपराव काटे व बाळासाहेब भोर या शिक्षकांची सुध्दा राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाली आहे.

या निवडी बद्दल आमदार बबनराव पाचपुते,मा.जि.प अध्यक्ष बाबासाहेब भोस,राष्ट्रवादी प्रदेश उपध्यक्ष घनश्याम शेलार,नगरध्यक्ष मनोहर पोटे,भगवान पाचपुते,अरुणराव पाचपुते,प्रहारचे शहरध्यक्ष नितीन रोही, इन्स्पेक्टर तुकाराम कन्हेकर,सतीश जगताप (प्राचार्य- जनता विद्यालय काष्टी) पर्यवेक्षक शहाजी हिरडे,ज्येष्ठ शिक्षक पळसकर पी बी,ढवळे संजय विद्या समिती चे सदस्य श्री दीपक भोसले पाटील, बाजीराव कोरडे,शहाजी मखरे,रंगनाथ राजपुरे आधीनीं शुभेच्छा दिल्या आहेत.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News