पोलिस हा समाजाच्या स्थैर्यासाठी अहोरात्र झटत असतो त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण आपली सामाजिक बांधीलकी- राजेंद्र ठवरे


पोलिस हा समाजाच्या स्थैर्यासाठी अहोरात्र झटत असतो  त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण आपली सामाजिक बांधीलकी-  राजेंद्र ठवरे

भिगवण ( प्रतिनिधी ) नानासाहेब मारकड 

    पोलिस हा समाजाच्या स्थैर्यासाठी अहोरात्र झटत असतो  त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण आपली बांधीलकी असल्याच मत सेवानिवृत्त पोलीस राजेंद्र ठवरे यांनी व्यक्त केले.

सध्याच्या काळात कोरोनाने जगात थैमान घातले आहे. कोरोना पासुन बचाव व्हावा यासाठी भिगवण पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना राजेंद्र ठवरे यांनी स्टीम इनहेलर मशिन वाटप केल्या भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात आहे ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान माजवले आहे इंदापुर तालुक्यात १००० कोरोना पॉजिटिव्ह रुग्न आहेत त्यातच भिगवण महामार्गावरील मोठी बाजारपेठे असलेले गाव असल्याने पोलिसांना अधिक धोका आहे यामुळे भिगवण पोलिसांच्यासाठी वाफेचे मशिन देण्यात आले आहेत.

     यावेळी भिगवण रोटरी क्लबचे आणि भिगवणचे माजी सरपंच महेश शेंडगे,अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे आबा बंडगर,भिगवण पत्रकार संघाचे संस्थापक दादा थोरात, अमोल कांबळे,नानासाहेब  मारकड, नितीन चितळकर, तुषार हगारे आदी उपस्थित होते.राजेंद्र ठवरे यांच्या हस्ते भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्याकडे मशिन देण्यात आल्या.  

    राजेंद्र ठवरे बांधकाम व्यावसाय करतात मात्र माजी पोलिस कर्मचारी असल्याने पोलिसांच्या व्यथा माहिती असल्याने ठवरे यांनी पोलिसांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला.  कोरोनाच्या काळात पोलिसांना सर्वाधिक काळ काम करावे लागतेय जनजागृती पासुन दंडुके वापरण्यापर्यंत सर्व काम करण्याची वेळ पोलिसांच्यावर आलीय अनेकांना सामोरे जावे लागते यामुळे राज्यात अनेक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अशा वेळी भिगवण पोलिसांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतल्याचे माजी पोलिस राजेंद्र ठवरे यांनी यावेळी बोलताना सांगितलें .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News