भव्य असे "भुलेश्वर" मंदिर.....


भव्य असे "भुलेश्वर" मंदिर.....

सह्याद्री पर्वत रांगेतुन दिवे घाटापासुन पुर्वे कडे निघालेल्या डोंगररांगेत शेवटच्या टेकडीवर महाराष्ट्रात जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणुन ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे भुलेश्वर

     हिमालयात एकदा पत्नी पार्वतीसोबत सारीपाटाच्या डावामध्ये भगवान शिव शंकर पराजीत झाल्यानंतर याठिकानी येऊन तपसाधना करत होते .त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असणारी गंगा याठिकाणी पडल्या मुळे याठिकाणी शिवलिंगाखाली सतत पाणी असते.तसेच मुख्य शिवलिंगाखाली ब्रम्हा , विष्णू , महेश अशी तीन स्वयंभू लिंगे आहेत. याठिकानी तपसाधना करत असताना पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना भुलवण्यासाठी भिल्लीनीचे रुप घेऊन नाच केला व भगवान शिवशंकर भुलले ते ओळखुच शकले नाहीत पार्वतीमातेस म्हणुन याठिकीणास भुलेश्वर नाव पडले अशी आख्यायिका आहे.

     विचार केला तर असे वाटते की , बाहेरुन इतके साधे दिसणारे मंदिर आत आल्यानंतर शिल्पकलेने किती परिपुर्ण आहे.या शिल्पकलेला पाहुन आपन भुलुन जातो म्हणुन सुध्दा भुलेश्वर नाव पडले असावे. किंवा बाह्यरुपास नभुलता अंतर रुप पहा म्हणुन भुलेश्वर नाव पडले असावे असे वाटते.

    मंदिराची रचना हेमाडपंथी पध्दतीची असुन मंदिराच्या बांधकामाविषयी कुठेही शिलालेख नाही. परंतु याठिकाणी असणा-या सप्तमातृकांच्या मुर्तीवरुण मंदिर १० व्या शतकापुर्वीचे असल्याचे वाटते . मंदिर बांधकामासाठी वापरलेला चार प्रकारचा दगड व न्हानी कुंड पाहिल्यावर  मुख्य मंदिर ; ओवरी ; आवारभिंत ; सभामंडप व शिखरे अशा चार टप्यात मंदिराचे बांधकाम झाल्याचे जाणवते. कारण पुर्वी मंदिर बांधल्यानंतर पुजेचे पाणी थेट मंदिराबाहेर निघेल अशी व्यवस्था केलेली असायची पन या ठिकाणी पाणी न्हानी कुंडातुन उपसुन काढावे लागते .

     मंदिरा समोर असणारा सभामंडप व त्यावरिल नगारखाना व तीन शिखरे याचे बांधकाम पुण्याचे पेशवे व सातारचे शाहु महाराज यांचे गुरु ब्रम्हेद्रस्वामी यांनी केल्याचे पुरावे सापडतात.

  सभामंडप पार करुण पुढे आल्यावर लाकडी दरवाजापुढे एका दगडी चौकटित मारुतीची मुर्ती दिसते ती कालांतराने नंतर बसवली असल्याचे जानवते.पुढे दगडी जीना चढुन वर आल्यानंतर भव्य दगडी नंदी दिसतो व नंदिसमोर गाभा-यात भुलेश्वर महादेव . भुलेश्वराचे दरिशन करुण बाहेर आल्या वर प्रदक्षिणा मार्गावर सिता स्वयंवर , चौसष्ट योगिनी , सप्तमातृका , सितेचे अपहरण , महाभारतातील युध्द प्रसंग , शरपंजिरी भिष्माचार्य, द्रौपदी स्वयंवर , समुद्रमंथन अशी विविध शिल्प पहावयास मिळतात .

   डोंगरावर असणारे बुरंज दिसल्यावर पुर्वी याठिकाणी किल्ला असल्याचे जाणवते .डोंगराला पुर्ण प्रदक्षिणा मारली तर चांगल्या व पडलेल्या अवस्थेतील २७ बुरुंज व तटबंदि दिसते.

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत वन उद्यान दिसते . माळशिरस गाव पुर्वी याच ठिकाणी असल्याच्या खुणा आजही या ठिकाणी सापडतात. १६ व्या शतकात आदिलशाहीतील सरदार मुरार जोगदेव याने पुण्याच्या संरक्षणार्थ याठिकाणी दौलत मंगळ किल्याची बांधणी केली . त्यानंतर याठिकाणी  बरीच आक्रमणे सुध्दा झाली यामुळेच माळशिरस गाव स्थलांतरीत झाल्याचे बोलले जाते. भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत वन उद्यान दिसते . माळशिरस गाव पुर्वी याच ठिकाणी असल्याच्या खुणा आजही या ठिकाणी सापडतात.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News