निंबेनांदूर येथून पुढे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडवले पाहिजे, अडवले पाणी व्यवस्थापन करूनण जिरवले पाहिजे तरच शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ शकतात- सौ. हर्षदाताई काकडे


निंबेनांदूर  येथून पुढे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडवले पाहिजे, अडवले पाणी व्यवस्थापन करूनण जिरवले पाहिजे तरच शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ शकतात- सौ. हर्षदाताई काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

आज निंबेनांदूर येथील ढोरा नदीवरील बंधाराच्या पाण्याचे सौ.काकडेंच्या हस्ते जलपूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोशल डिस्टंगसिंगचे पूर्णपणे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास उदय बुधवंत, अशोक दातीर, ज्ञानदेव यादव, रमेश भालसिंग, मोतीराम काळे, संजय बुधवंत, रज्जाकभाई शेख, चंद्रकांत पुंडे, सुभाष पुंडे, अशोक पुंडे, रामकिसन शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सौ. काकडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येऊन आभार मानण्यात आले. यावेळी सौ काकडे म्हणाल्या की सध्या covid-19 च्या आजारांनी सर्वत्र धुमाकूळ घातला असून आपण शासनाचे नियमांचे पालन करून त्यावर विजय मिळवूच.  चालू वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. मी सन २०१३-१४ ला हा बंधारा दिला होता. तेव्हापासून बंधारा पाणी पहायला यायचे होते. आज ग्रामस्थांनी येण्याचा आग्रह करून बोलवुन माझा सन्मान केला फार आनंद झाला. येथून पुढे शेतकऱ्यांनी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवले पाहिजे. जमिनीमध्ये जिरवले पाहिजे. शेवगाव तालुक्यातील सततच्या दुष्काळाला आपल्याला अशाच पद्धतीने संपवावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापरही योग्य प्रकारे केला पाहिजे असेही सौ.काकडे म्हणाल्या. यावेळी सुनील पुंडे म्हणाले की, आमच्या निंबेनांदुर मधील बोरबन वस्ती सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित असणारा भाग आहे. परंतु सौ. काकडे ताईंनी बंधारा दिला व गेली पाच-सहा वर्षापासून आमच्या शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे. या बंधाऱ्यांचा फायदा वाघोली निंबेनांदूर या दोन गावांना होत आहे. आमच्या रस्त्याच्या अडचणीकडे त्यांनी लक्ष द्यावे असेही ते बोलताना म्हणाले व ताईंचे आभार मानले. यावेळी अमोल भालसिंग यांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास नंदाताई पुंडे, राधाताई पुंडे, भिमाबाई पुंडे, प्रयोगाबाई पुंडे, उषा पुंडे, सीमा पुंडे, मंगल पुंडे, जनाबाई पुंडे, सरिता पुंडे, अर्चना शिंदे, एकनाथ शिंदे, नवनाथ पुंडे, माणिक पुंडे, साहेबराव वाकडे, सोन्याबापु पुंडे इ. शेतकरी, महिला उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News