बारामती : प्रतिनिधी(काशिनाथ पिंगळे)
बारामती शहरातील श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष, बारामती अॅग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे अध्यक्ष आणि सांगवी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व स्वखर्चातून श्रीराम मंदिराची उभारणी करणारे ह.भ.प. भगवानराव बाबुराव तावरे (वय ८४) यांचे मंगळवारी निधन झाले.
माळेगाव कारखान्यात चिटबॉय म्हणून नोकरी केलेल्या ह.भ.प. भगवानराव तावरे यांची प्रभू श्रीरामावर अढळ श्रद्धा होती. त्यातूनच त्यांनी बारामती शहरातील श्रीरामनगर येथे स्वखर्चातून श्रीराम मंदिराची उभारणी केली. या मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य त्यांनी हाती घेतले होते. बारामती शहरातील श्रीरामनगर, माऊलीनगर या परिसराच्या उभारणीतही त्यांनी मोठे योगदान दिले होते.
दशक्रिया विधी गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जुन्या तहसील कार्यालया शेजारील दशक्रिया विधी घाट येथे होणार आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीमुळे नियमांचे पालन करून हा विधी करण्यात येणार आहे.
ॲग्रो टुरिझम क्षेत्रातील नामवंत पांडुरंग तावरे आणि प्रसिद्ध वकील ॲड. हरीश तावरे यांचे ते वडील होत.