आमदार आशुतोष काळेंच्या दणक्याने समृध्दी महामार्ग व्यवस्थापनाने सर्वच वीज वाहिन्यांना टाकले वेष्ठन !!


आमदार आशुतोष काळेंच्या दणक्याने समृध्दी महामार्ग व्यवस्थापनाने सर्वच वीज वाहिन्यांना टाकले वेष्ठन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामध्ये ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जात आहे त्या ठिकाणी भूमिगत टाकण्यात येणाऱ्या वीजवाहिन्यांना टणक पाईपाचे वेष्टन नसल्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापकास चांगलेच झापल्यामुळे कोपरगाव तालुक्यातून समृद्धी महामार्ग ओलांडून जात असलेल्या सर्वच वीज वाहिन्यांना वेष्ठण टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

              मागील आठवड्यात समृद्धी महामार्गाबाबत झालेल्या विविध बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे व दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, समृद्धी महामार्गाचे अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यासाठी असणाऱ्या नियंत्रण कार्यालयात बैठक घेतली होती. बैठक आटोपून समृद्धी महामार्ग ओलांडून जात असलेल्या वीजवाहिन्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे वेष्ठण पाईप वापरले याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार आशुतोष काळेंना सदर वीजवाहिन्या वीणा वेष्ठणच टाकल्याचे निदर्शनास येताच त्यांनी समृद्धी महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापकास धारेवर धरून कानउघाडणी केली होती. कोपरगाव तालुक्यात ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून गेल्या आहेत त्या सर्वच ठिकाणी उकरून महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, समृद्धी महामार्ग,महावितरणचे अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेवून पाहणी करावी. यापुढे ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जाणार आहे त्या ठिकाणी सर्व अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांना समोर दिवसा काम करावे असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले होते. आमदार आशुतोष काळेंनी केलेल्या कान उघाडणीचा धसका घेवून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून समृद्धी महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापकाकडून कोपरगाव तालुक्यात ज्या ठिकाणी वीज वाहिन्या समृद्धी  महामार्ग ओलांडून जात आहेताहेत त्या सर्वच वीज वाहिन्यांना वेष्ठण टाकण्याचे काम सुरु केले आहे. या सर्व वीज वाहिन्यांना वेष्ठण टाकण्यात आल्यामुळे भविष्यात या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News