दौंड:
दौंड तालुक्यातील सर्व फोटो ग्राफर यांची बैठक दौंड येथील हरी ओम सभागृहात पार पडली. यामध्ये दाैंड येथे फाेटाेग्राफर मंडळाची कार्यकारणी सर्वानुमते अंतीम करण्यात आली . यामध्ये संपुर्ण तालुक्यातुन एकुण १३ लाेकांची कार्यकारणी ठरविण्यात आली यामध्ये हरी ओम कलर लॅबचे सुनिल मुलचंदानी यांना दौंड शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर रूपछाया कलर लॅबचे वैभव म्हेत्रे यांची दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन चा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यामधे याेगेश लांडगे उपाध्यक्ष ,अतुल जाधव कार्यअध्यक्ष , राजीव शिंदे सचिव, सचिन गायकवाड खजीनदार, तर कैलास पंडीत, दिलिप माेरे ,नितिन काकडे, अतुल धारेकर, सुशांत जगताप , बाळसाहेब माेरे इ ची संचालक म्हनुन निवड करण्यात आली. दौंड शहर अध्यक्ष सुनिल मुलचंदानी व तालुका अध्यक्ष वैभव म्हेत्रे . यांनी बोलताना सांगितले की नक्कीच फोटोग्राफर कडीअडचनींना संघटना उभी राहील.