सेवानिवृत जवान ज्ञानेश्वर गुरसळ यांचा डाउच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार


सेवानिवृत जवान ज्ञानेश्वर गुरसळ यांचा डाउच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील डाउच खुर्द गावचे सुपुत्र हवालदार ज्ञानेश्वर दौलत गुरसळ हे भारतीय सेनादलातील सेवेतुन निवृत्त झाले असुन ते आपल्या गावी परतले आहे. त्याच्या येण्याने कुटंब,मित्रपरिवार, व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.सेनादलात असताना ज्ञानेश्नर गुरसळ यांनी सलग १९ वर्ष आपल्या भारतमातेची सेवा केली आहे. त्यांच्या या ऋुणातुन उतराई होण्यासाठी डाऊच खुर्द येथील त्यांचा मित्र परीवार,ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरीकांच्यावतीने पंकज पुंगळ यांनी शाल व श्रीफळ देउन त्यांचा सत्कार केला.

कुस्ती खेळाचा वारसा लाभलेल्या ज्या गावाने तालुक्याला अनेक कुस्तीपटू दिले त्या डाउच खुर्द गावात एका शेतकरी कुंटुंबात ज्ञानेश्वर गुरसळ यांचा जन्म झाला.वयाच्या १८व्या वर्षी  सेनादलात त्यांची निवड झाली. दोन वर्षाच्या ट्रेनिंग नंतर सलग १९ वर्ष देशाची सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. या सत्कार प्रसंगी पंकजभाऊ पुंगळ,राजूभाऊ होन,निरंजन पुंगळ, केशव भाऊ गुरसळ, अतुल भाऊ गुरसळ, कैलास गुरसळ, संतोष भाऊ पुंगळ, ज्येष्ठ नागरिक भास्कर गुरसळ, ज्ञानेश्वरआप्पा गुरसळ, सुभाष पुंगळ. मच्छिंद्र बारसे, युवक,निलेश भाऊ, योगेश भाऊ बाबासाहेबभाऊ,शंकर भाऊ, आणि इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. ज्ञानेश्वर गुरसळ यांचा कार्याचे सबंध डाउच खुर्द परीसरातुन कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News