श्रीगोंदा- जामखेड रोड वरील औटेवाडी नजीक अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले


श्रीगोंदा- जामखेड रोड वरील औटेवाडी नजीक अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले

अरुंद रोड, वळण, फलक नसल्याने  रस्ते बनले धोकादायक


अंकुश तुपे .श्रीगोंदा प्रतिनिधी: 

दौंड- श्रीगोंदा. मेनरोड. जामखेड रोड वरील औटेवाडी नजीक अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून येथील वळण फ़लक नसल्याने धोकादायक बनले आहे काल उभा ठिकाणी श्रीगोंदयाकडे जाणाऱ्या पिकअप मालवाहतूक वाहनाची समोरून येणाऱ्या टेम्पोशी धडक होऊन दोन्ही वाहनांची दिशाच बदलली पिकअप चालकाने प्रसंगावधान राखत वाहन वळविल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही पण टेम्पोचे नुकसान झाले.

या रस्त्याचे दीड किलोमीटर पर्यंत श्रीगोंदा नगरपालिकेने रुंदीकरण व दुभाजक टाकले त्यापुढील रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असल्याचे नगरपालिका म्हणते तर सार्वजनिक बांधकाम खाते सदर रस्ता प्रस्तावित राजमार्गासाठी असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करत नाही अरुंद रस्ता व धोकादायक वळणामुळे अनेक अपघात झाले कालच्या अपघातात नंतर श्रीगोंदा पोलिसांना प्रतिनिधीने कळविताच धाव घेतली जखमीला दवाखान्यात तातडीने पाठविले या रस्त्यावर होणारे नित्य अपघात परिसरातील रहिवाशी तसेच वाहन चालकांना डोकेदुखी ठरली आहे या रस्त्याचे तातडीने काम सुरू व्हावे तसेच वळणावर फलक लावण्याची मागणी होतआहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News