कोरोना योद्ध्यांच्या हस्ते श्रीगणेश विसर्जन!! बेलवंडी फाटा : हॉटेल रायगड सार्वजनिक गणेशोत्सव


कोरोना योद्ध्यांच्या हस्ते श्रीगणेश विसर्जन!! बेलवंडी फाटा : हॉटेल रायगड सार्वजनिक गणेशोत्सव

बेलवंडी फाटा ( ता. श्रीगोंदा ) येथील हॉटेल रायगड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेशाच्या विसर्जना प्रसंगी आरती करताना डॉ. विकास पाटील. समवेत पोलीस निरिक्षक अरविंद माने .

अंकुश तुपे श्रीगोंदा  प्रतिनिधी:

              श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथील हॉटेल रायगड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेशाचे कोरोना योद्ध्यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले.

              कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा सर्वत्रच अगदी साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बेलवंडी फाटा येथील हॉटेल रायगड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मात्र सामाजिक उपक्रम राबविताना कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेची काळजी करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, उदयोजक, राजकीय पदाधिकारी, अधिकारी व पत्रकार बांधवांच्या हस्ते दररोज गणेशाची आरती करताना जि.प. सदस्या कोमल वाखारे, पं.स. सदस्या कल्याणी लोखंडे, देवदैठण प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पडवळ, बाबूशेठ राक्षे आदींसह अनेक गावच्या सरपंचांना जोडीने श्री गणेशाची आरती करण्याचा मान दिला. यावेळी या प्रत्येक जोडीला हॉटेल रायगडच्या वतीने सतिश वाघमारे यांच्या हस्ते केशर आंब्याचे रोप भेट देण्यात आले.

              मंगळवार दि. १ सप्टेबर रोजी सायंकाळी ५ वा. शासनाच्या अटींचे काटेकोरपणे पालन करत अगदी साधेपणाने गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या काळात पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व पत्रकार बांधवांनी सर्वसामान्यांच्या जीवाची काळजी घेत कोरोना महामारीच्या संकटाचा योद्ध्या प्रमाणे यशस्वी सामना केला. त्यांच्या या कार्याचे ऋण व्यक्त करताना हॉटेल रायगड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरविंद माने, स्त्रीरोग तज्ञ डॉ. विकास पाटील, पत्रकार दीपक वाघमारे या कोरोना योद्ध्यांच्या हस्ते आरती करत गणपतीचे विसर्जन केले. त्यानंतर यांनाही केशर आंब्याचे रोप भेट देण्यात आले. यावेळी धनेश राक्षे, लहू महाराज यादव, श्रावण राक्षे, बाळासाहेब राक्षे, प्रसाद दिवटे, शरद वाघमारे, दादाभाऊ तरटे, रावसाहेब सोनूळे, बाळासाहेब यादव, मयूर वेताळ, पप्पू पुंड, संदिप आबूज, सचिन यादव आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या वतीने यंदा गणेशोत्सव व गणपतीचे विसर्जन अगदी साधेपणात साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्वत्रच साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. हॉटेल रायगड गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविताना कोरोना योद्ध्यांच्या हस्ते आरती व त्यांना आंब्याचे रोप भेट दिले. तसेच त्यांच्याच हस्ते अगदी साधेपणात गणपतीचे विसर्जन करत कौतुकास्पद कार्यक्रम करत  सामाजिक बांधिलकी जोपासली. 

             अरविंद माने....   पोलीस निरिक्षक, बेलवंडी

 श्रीगोंदयाच्या पश्चिमेकडील टोकाला असणाऱ्या येळपणे गटात तरुण मंडळांनी जरी एक गाव एक गणपतीला अत्यल्प प्रतिसाद दिला असला तरी सर्वच गावातील तरुण गणेश मंडळांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करताना साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे विसर्जन करतानाही कुठेही गर्दी न करता ना कुठले वादय वाजवता साधेपणात गणरायाला निरोप दिला. बेलवंडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांत अनेक ठिकाणी पोलीस निरीक्षक अरविंद माने व कर्मचाऱ्यांनी भेटि दिल्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News