हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी वाफेच्या मशीनी भेट


हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी वाफेच्या मशीनी भेट

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा कारागृहातील (सबजेल) बंदीवानांच्या आरोग्यासाठी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने इलेक्ट्रिक वाफेच्या मशीनी भेट देण्यात आल्या. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. सदर वाफेचे मशीन वरिष्ठ कारागृह अधिकारी शामकांत शेडगे यांना सुपुर्द करण्यात आले.

कोरोना महामारीच्या संकटकाळात सबजेल मधील बंदीवानांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यांना दररोज योग, प्राणायाम व व्यायामाचे धडे दिले जात आहे. त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी देखील केली जात आहे. या कोरोनाच्या संकटकाळात त्यांचा सर्दीच्या आजारापासून बचाव होण्यासाठी हेल्पिंग हॅण्डसच्या वतीने वाफेच्या मशीनी भेट देण्यात आल्या.

टाळेबंदीत हातावर पोट असणारे, शहरात अडकलेले परप्रांतीय, आर्थिक दुर्बलघटक व सर्वसामान्य नागरिकांचे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत या घटकांना आधार देण्यासाठी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने त्यांना अन्न-धान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पशु-पक्ष्यांची देखील खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती. तसेच कर्तव्य बजाविणार्‍या पोलीसांसाठी दररोज चहा व नाष्टयाची सोय देखील करण्यात आली होती. फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम तीन ते चार महिन्यापासून टाळेबंदी काळात अहोरात्र सुरु होता. तर सध्या देखील अनेक गरजूंना मदत पुरवली जात असल्याचे भैय्या बॉक्सर यांनी स्पष्ट केले. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा कारागृहातील (सबजेल) बंदीवानांच्या आरोग्यासाठी हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या वतीने इलेक्ट्रिक वाफेच्या मशीनी वरिष्ठ कारागृह अधिकारी शामकांत शेडगे यांच्याकडे सुपुर्द करताना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News