तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात मंजुर झालेल्या नगरषरीषदेच्या बांधकामासाठीचे दुसऱ्या टप्यातील 2 कोटी रूपये झाले मंजुर !! विजय वाजे


तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात मंजुर झालेल्या नगरषरीषदेच्या बांधकामासाठीचे दुसऱ्या टप्यातील 2 कोटी रूपये झाले मंजुर !! विजय वाजे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव नगरपरिषदेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे  यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून रूपये 7 कोटी रकमेची मागणी केली होती, त्यानुसार नवीन इमारतीच्या कामासाठी पहिला टप्पा दोन कोटी रूपये 24 आॅगस्ट 2016 च्या शासन निर्णयान्वये नगरपालिकेला वर्ग करण्यात आला.त्यानुसार सौ कोल्हे यांच्या शुभहस्ते नगरपालिका इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते, व कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली. तत्कालीन सरकारच्या काळात मंजुर झालेल्या या कामासाठी दुस-या टप्प्यातील रूपये 2 कोटी रक्कम मंजुर झाली असल्याचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी सांगितले.

सन 1947 मध्ये स्थापन झालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली असुन मोडकळीस आलेली होती. नागरीक, अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वापराच्या दृष्टीने इमारत धोकादायक झाली असल्याने नव्याने बांधण्याची 

आवश्यकता होती, कोपरगाव नगरपरिषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत असल्याने नगरपालिकेला इमारत बांधणे शक्य नव्हते, म्हणून माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री रणजीत पाटील यांचेकडे या इमारतीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली होती, अंदाजित खर्च रक्कम रूपये 7 कोटी या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असून सदरचा निधी मंजुर करण्यात यावा यासाठी वारंवार पाठपुरावा करून सौ कोल्हे यांनी 

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सदरच्या कामास मंजुरी मिळविली, त्यानुसार या इमारतीच्या कामासाठी दि.24 आॅगस्ट 2016 च्या शासन निर्णयानुसार दोन कोटी रूपयाचा निधीही कोपरगाव नगरपालिकेकडे वर्ग केला, त्यानुसार काम सुरू झाले, याच मंजुर कामासाठी या निधीतील दुस-या टप्प्यातील रक्कम  दोन कोटी रूपये मंजुर झाली आहे. सदरची रक्कम नगरपरिषदेसाठी मंजुर झाली असल्यामुळे नगरपरिषदेचे उर्वरीत काम पुर्ण होण्यास मदत होणार असल्याने सदर इमारतीचे काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी श्री वाजे यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News