जलप्रदुषण रोखण्यासाठी कोपरगावकरांनी केले संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या विसर्जन कुंडामध्ये मुर्तीचे विसर्जन


जलप्रदुषण रोखण्यासाठी कोपरगावकरांनी केले संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या विसर्जन कुंडामध्ये मुर्तीचे विसर्जन

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव - कोेरोना आजाराच्या पाश्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आणि जलप्रदुषण रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संजीवनी युवा प्रतिष्ठाणने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन कुंडामुळे गैरसोय दूर झाली. मोठया उत्साहात नागरीकांनी या मोहिमेला साथ देउन दारापर्यंत आलेल्या कुंडामध्ये श्री गणेशमुर्तीचे विसर्जन करून श्री गणरायाला निरोप दिला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विवेक बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानने तयार केलेल्या विसर्जन कुंडामध्ये श्री साईबाबा तपोभूमी येथे कुंडाची विधीवत पुजा करून येथील श्री गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. सध्याच्या कोरोना आजाराचा संसर्ग होउ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. याच पाश्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट होते, अशा परिस्थितीत नागरीकांनी आपापल्या घरात श्री गणेश मुर्तींची स्थापना केली. परंतू गर्दी टाळण्यासाठी आणि जलप्रदुषण रोखण्यासाठी नदी पात्रात विसर्जन करण्यात येउ नये, या प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे नागरीकांना विसर्जन करण्याचा प्रश्न निर्माण झाला, परंतु विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिप्ठाणच्या युवकांनी सजविलेल्या ट्रॅंक्टरमध्ये तयार केलेले कुंड शहरातील विविध उपनगरात दारोदारी फिरविण्यात आले. त्यावेळी नागरीकांची श्री विसर्जनाची गैरसोय दूर झाली, युवा सेवकांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे नागरीकांनी मोठया उत्साहात श्री गणरायाला निरोप दिला. यासाठी संजीवनी युवा प्रतिप्ठाणचे युवा सेवक सिध्दार्थ साठे, वासुदेव शिंदे, रामदास गायकवाड, रोहित कनगरे, सिध्दार्थ पाटणकर,ओम बागुल, सागर राउत, निशांत केकाण, दत्तु जाधव, बंटी माळी, संतोष भारूड, बाबासाहेब शिंदे, साहिल आहेर यांनी याकामी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News