गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामप्रस्थ महाचेतना विस्फोटचा प्रस्ताव!! सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी विकासात्मक दृष्ट्या करणार मार्गदर्शन


गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामप्रस्थ महाचेतना विस्फोटचा प्रस्ताव!! सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी विकासात्मक दृष्ट्या करणार मार्गदर्शन

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - गावा-गावात विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या व्यक्तींचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्याच्या हेतूने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने ग्रामप्रस्थ महाचेतना विस्फोटचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

गावातील शिकलेली माणसे शहरात गेल्याने शेतीसह इतर विकासात्मक कामाची परवड झाली. भारत हा खेड्यांचा देश असून, मोठ्या प्रमाणात पड जमीनी आहे. शेती परवडत नसल्याने अनेकजण शेती तशीच पड ठेवली आहे. सिंचन पाण्याचे व्यवस्थापन करुन या पड जमीनीवर शेती करता येऊ शकते. उन्नतचेतनेचा अभाव असल्याने गावे शाश्‍वत विकासापासून वंचित आहे. गावातील विविध क्षेत्रात सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेले सरकारी अधिकारी, कर्मचारी पेन्शन घेऊन आपले जीवन आनंदाने जगत आहे. मात्र अशा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांना गावाच्या विकासासाठी मदत घेतल्यास मोठा बदल घडणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजना, शेती अद्यावत करण्यासाठी मार्गदर्शन व ठिबक सिंचनचा वापर याबाबत मार्गदर्शन घेता येणार आहे.  गावे ही राजकीय अड्डे झाले असल्याने, जीरवा जीरवीच्या राजकारणामुळे विकास खुंटला आहे. ग्रामस्थांना दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांना मान, सन्मान दिल्यास ते देखील गावाच्या विकासात्मक दृष्टीने कामे करणार आहे. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला याची प्रचिती या कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना आली असून, शेती हा चांगला व्यवसाय असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. याला राज्य सरकारने देखील चालना देण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News