मानसोपचार विभाग जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांच्याकडून कोरोना बाधीतांचे समुपदेशन


मानसोपचार विभाग जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांच्याकडून  कोरोना बाधीतांचे समुपदेशन

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- संपूर्ण जगभर कोरोना महामारी पसरली आहे,या संसर्ग रोगा विषयी लोकामध्ये वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत,शोशल मीडियाच्या माध्यमातून तर या रोगाविषयी अनेक चांगल्या वाईट गोष्टीच्या अफवा पसरवल्या जात आहेत,त्यामुळे लोक या आजारापेक्षा त्याच्या मानसिक भीतीपोटी याच्या विळख्यात सापडले आहेत,हाच दृष्टिकोन समोर ठेवून मानसोपचार विभाग जिल्हा रुग्णालय पुणे यांनी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवून डॉ राहूल बागले मनोविकार तज्ञ,डॉ मिलिंद करज कर क्लिनिकल सायकोलोजिस्ट्

, डॉ मधुमिता बहाले विभाग प्रमुख,मनोस्पचार विभाग या सर्वांनी आणि यांच्या सहकार्यानी मिळून पुणे जिल्ह्यात जिथे जिथे कोविड सेंटर आहेत त्याठिकाणी जाऊन कोरोना बाधीत लोकांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्याचे काम ही टीम करीत आहे, कोविड 19 बद्दलचे गैरसमज यातून निर्माण होणारे ताण तणाव कमी करणे,मनाची स्थिती चांगली ठेवण्याबाबत मार्गदर्शन करणे,या सर्व गोष्टी स्वतः त्याठिकाणी जाऊन लोकांना समजावून सांगत आहेत,तसेच "मन समर्थ" नावाचे एक पुस्तक ते देत आहेत त्यामध्ये पेशंट कोविड सेंटर येथे असताना घ्यावयाची काळजी,घरी गेल्यानंतर पेशंट ने घ्यायची काळजी,त्यांच्या संपर्कात येणाऱ्या घरातील व्यक्ती,इतर नातेवाईक यांनी काय काळजी घ्यावी या विषयी या मन समर्थ पुस्तकात वाचायला मिळते,ते पुस्तक जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेंटरवर पोहोच केले जात आहे,तसेच या सर्वांची काळजी घेणारे आरोग्य सेवक,नर्स या सर्वांचे समुपदेशन ही टीम करीत आहे, या सर्व टीमने एप्रिल व मे महिन्यात स्थलांतरित कामगार होते,त्यातील 36600 कामगारांचे समुपदेशन केल्याची माहिती डॉ राहूल बागले यांनी दिली,तसेच दौंडच्या जनतेसाठी दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मासिक मानोस्पचार आणि औषधपचार सुविधा उपलब्ध असल्याचे यावेळी डॉ मिलिंद करजकर यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News