रब्बी कांदा रोपे तयार करताना घ्यावयाची काळजी !!बांधावरची शेतीशाळा सदरात


रब्बी कांदा रोपे तयार करताना घ्यावयाची काळजी !!बांधावरची शेतीशाळा सदरात

संकलन; विठ्ठल होले .दौंड प्रतिनिधी : 

               🌻बांधावरची शेतीशाळा🌻

नमस्कार मित्रांनो

आजच्या शेतीशाळा सदरात आपण कांदा रोपे तयार करताना काय काळजी घ्यावी याची थोडक्यात माहीती घेणार आहोत.

   मित्रांनो सध्या कांदा रोपाची तयारी चालू असेल कांदा बियाण्यांच्या किमती पण वाढत आहे 10000 ते 15000 रुपये पायली किंवा 2000 ते 4000 रुपये प्रति किलो एवढा कांदा बियाणे चा भाव चालू आहे. यावर्षी पाऊसमान खूपच चांगले आहे पुढच्या अगदी नोव्हेंबर महीन्यापर्यत पावसाचा अंदाज आहे म्हणजे कांदा रोपे पावसात टाकण्यासाठी तयारी करावी लागेल.

           कांदा बियाणे तसे नाजूक उगवणक्षमता वाढवण्यासाठी बियाणे प्रक्रिया करणेसाठी जैविक ट्रायकोडर्मा व पीएसबी वापर करा किंवा काही जण जर्मिनेटर पण वापर करत आहेत. परंतु यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कांदा रोप टाकताना पावसामुळे पाणी साठवून रोप किंवा बियाणे सडून जाणार आहे..पाऊस जर  2 ते 3 दिवस सलग आला तर रोपे पिवळे पडणे बियाणे उतारच होणार नाही ह्या समस्या वाढणार आहेत..मग यावर बुरशीनाशके फवारणी व वाफ्यातून पाणी काढून देणे एवढेच पर्याय आहे परंतु याने नुकसान होणारच खर्चही वाढणार 

त्यापेक्षा रोपे तयार करताना सपाट वाफे करू नका गादीवाफे करा बियाणे गादीवाफ्यावर टाका म्हणजे पाणी साचणार नाही मुळांची वाढ चांगली होईल खर्चिक होणार नाही  महागडे बियाणे पण वाचेल आणि साचलेलं पाणी काढून टाकता येईल विचार बदला नक्कीच फायदा मिळेल.

सहकार्य - आप्पासाहेब खाडे,कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग दौंड

जाहिरात
Search
विडिओ
Recent News