गणपती विसर्जन ची सुट्टी असताना दौंडचे आरोग्य अधिकारी,कर्मचारी ऑन ड्युटी,शासनाचे नियम पाळून जनतेने सुद्धा सहकार्य करावे - डॉ संग्राम डांगे


गणपती विसर्जन ची सुट्टी असताना दौंडचे आरोग्य अधिकारी,कर्मचारी ऑन ड्युटी,शासनाचे नियम पाळून जनतेने सुद्धा सहकार्य करावे - डॉ संग्राम डांगे

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- आज दिनांक 1/9/20 रोजी मा. विभागीय आयुक्त पुणे यांनी सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी सुट्टी दिली असताना सुद्धा दौंड वासियांच्या रुग्णसेवेत खंड न पडू देता उपजिल्हा रुग्णालय दौंड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सुट्टी न  उपभोगता एकुण 107 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 5 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 102 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 1,पुरूष --4,प्रभाग -दौंड शहर=1,Srpf-7=2,ग्रामीण=2

  हे सर्व व्यक्ती 25 ते  70 वर्ष वयोगटातील आहेत अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली. यावेळी डॉ संग्राम डांगे म्हणाले कोरोना संसर्ग वाढत आहे,आम्ही सर्व अधिकारी,कर्मचारी जनतेच्या सेवेत आहोत,आज गणपती विसर्जन ची सुट्टी असताना आम्ही सर्व जण कामावर आहोत,ते आमचे कर्तव्य आहे परंतु जनतेने सुद्धा सहकार्य करावे,शासनाने जे नियम दिले आहेत ते नियम पाळावे,जेणेकरून आपण कोरोना वर मात करू शकतो डॉक्टरांवर विश्वास ठेवा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News