दौंड मध्ये विना मास्क, ट्रीपल सीट फिरणाऱ्या वर पोलिसांची कारवाई,ही कारवाई रोज करण्यात येणार आहे -- पोलीस निरीक्षक सुनील महाडिक


दौंड मध्ये विना मास्क, ट्रीपल सीट फिरणाऱ्या वर पोलिसांची कारवाई,ही कारवाई रोज करण्यात येणार आहे -- पोलीस निरीक्षक सुनील महाडिक

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --  दौंड शहरात   कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे,त्यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आयुष प्रसाद यांनी दोन दिवसापूर्वी दौंड तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेतली होती,त्यावेळी त्यांनी पोलिसांना विना मास्क फिरणारे,विनाकारण गर्दी करून थांबणारे,डबल, ट्रिपल सीट दुचाकीवर फिरणारे अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते,त्यानुसार दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्वतः चौकात सहकर्या बरोबर थांबून कारवाई केली,त्यामध्ये 173000 रुपये दंड वसूल करण्यात आला असून ही कारवाई रोज करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले आहे.मास्क लावणे हे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे त्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी,मास्क चा वापर करावा,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,कामाशिवाय बाहेर फिरू नये सर्वांनी मिळून या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News