महिला गृह उद्योग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत ला निवेदन


महिला गृह उद्योग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत ला निवेदन

शिर्डी, राजेंद्र दूनबळे , प्रतिनिधी,

सावळीविहिर येथे उद्योग धंदा निर्माण होण्यासाठी येथील  महिला मंडळांनी एकत्र येऊन ,महिला गृह उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला असून सावळी विहीर येथील लुंबिनी बुद्ध विहारात या करिता परवानगी मिळावी म्हणून  ग्रामपंचायत सावळीविहीरला निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी 

सरपंच,संतोष आगलावे, कृषी बाजार समिती राहाता संचालक बाळासाहेब जपे, यांनी निवेदन स्वीकारले 

सदर निवेदनात म्हटले आहे की कोविड मूळे गेल्या 6 महिन्यापासून काम ठप्प आहे सर्व कामे बंद आहे

आर्थिक परिस्तिथी ढासळली आहे ,रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे सर्व नियमाच्या आधीन राहून आम्ही महिला गृह उद्योग सुरू करीत असून तरी परवानगी मिळावी असे म्हटले आहे. या वेळी माजी,सरपंच सोपानराव पवार,मधुकर वाघमारे,पो,पा,सुरेश वाघमारे,नितीन वाघमारे,गोकुळ पवार,रवींद्र वाघमारे,सचिन वाघमारे,राजू वाघमारे, संतोष वाघमारे,तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्तीत होते,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News