विवाहित महिलेने आपल्या चारवर्षा च्या मुलीसह विहिरीत ऊडीमारुन आत्म हत्या केली


विवाहित महिलेने आपल्या चारवर्षा च्या मुलीसह विहिरीत ऊडीमारुन आत्म हत्या केली

 प्रतिनिधी, सज्जाद पठाण

एका विवाहीत तरुणीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कोळगाव येथे घडली .आज सकाळी ती उघडकीस आली . शेवगाव पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे .

       उषा गणेश झिरपे ( वय २४ ) व गायत्री गणेश झिरपे ( वय ४ ) अशी मृत मायलेकीची नावे असून मृत माहिलेचा पति गणेश झिरपे यांनी या संदर्भात खबर देऊन माहिती दिली आहे की, काल उषा हीने पतीबरोबर शेतात न जाता मी घरी थांबते असे सांगून पतीला एकटयाला शेतात पाठविले . सायंकाळी पती आल्यावर उषा व मुलगी गायत्री घरात नव्हत्या . त्यामुळे पाहूण्याकडे संपर्क साधून चौकशी केली तरीही त्यांचा तपास लागला नाही . आज सकाळी त्यांच्याच जवळच्या शेतातील विहिरीच्या कडेला उषाच्या चपला आढळल्याने विहिरीत गळ टाकून शोध घेण्यात आला असता दोघीचेही मृतदेह आढळून आले. ते वर काढण्यात आले. मायलेकी विहिरीत पडून मेल्याची खबर शेवगाव पोलिसात देण्यात आली. पंचनाम्यानंतर शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले .कोळगाव येथे शोकाकूल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News