आयसीएमआर नवी दिल्ली या संस्थेने मढेवडगाव येथील ४४ जणांचे रक्त नमुने गोळा केले.


आयसीएमआर नवी दिल्ली या संस्थेने मढेवडगाव येथील ४४ जणांचे रक्त नमुने गोळा केले.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२६:  आय सी एम आर नवी दिल्ली यांच्यावतीने (कोविड-१९ सर्व्हे सॅम्पल कलेक्शन) सीरो सर्वेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील दहा गावांची निवड झाली होती. प्रत्येक गावातून ६० लोकांचे रक्त नमुने व जिल्ह्यातील दहा गावांमधून सहाशे  लोकांचे रक्त नमुने गोळा करण्यात आले. या सर्व्हेसाठी श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव या एकमेव गावाची निवड झाली होती. गावातील ४४ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले.याआधीही मढेवडगाव येथील रक्त नमुने नेण्यात आले होते. याचा उपयोग कोरोना महामारी इतिहास, अँटी बॉडीज निर्मिती व प्रतिकार शक्ती प्रयोगासाठी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले.

         या चाचणीच्या शुभारंभ प्रसंगी आय सी एम आर पथकाचे प्रमुख डॉ.अविनाश शिंदे,डॉ. काटे, डॉ. खर्चन,डॉ. सुनिल शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. पंकज मोरे,डॉ. बाबासाहेब पंडित, सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच जयश्री धावडे, प्रा. फुलसिंग मांडे, ग्रामसचिव गोरक्षनाथ गायकवाड,कल्याणी गाढवे, अंबादास मांडे, गेणाभाऊ मांडे,गणेश मांडे,अमोल गाढवे, सचिन उंडे,मधू उंडे,काळूराम ससाणे,दीपक गाडे,भगवान धावडे अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News