कोपरगाव शहरातील दुषित घाण पाणी नदीत गेलेल नगरपरिषदेला चालते !! मग बाप्पा विसर्जन का नको ? - मंगेश पाटील


कोपरगाव शहरातील दुषित घाण पाणी नदीत गेलेल नगरपरिषदेला चालते !! मग बाप्पा विसर्जन का नको ?  - मंगेश पाटील

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी:

कोपरगाव नगरपालिका दररोज खंदक नाला,मोहिनीराज नगर तसेच शहरातील इतर भागातील व ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात घान पाणी नदीत सोडलेले चालते तर गणपती बाप्पाच विसर्जन का चालत नाही विचार करायला लावणारी परिस्थिती आहे असा सवाल  मंगेश पाटील यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे .

ते पुढे म्हणाले की शहरातील सर्वे शौचालयाचे वेस्टज घरगुती कामासाठी वापरलेले सर्वे खराब  सांडपाणी,मटनासाठी कत्तल केलेल्या जनावरांचे रक्त आणि त्याची घाण,गटारींतून नदीला जाऊन मिळते,त्यावर उपाय करने  नागरपरिषदे च्या हातात आहे जर नगर परीषदेने यासाठी गावातील सर्वे वेस्ट वॉटर एकत्र करून इफ्लूअंट ट्रीटमेंट प्लांट मार्फत शुद्ध करून त्यातील खत आणि पाणी ही ते शेतीला विकू शकतात , 

( ETP ) Plant)चा उपक्रम राबवण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून चालु असुन आजपर्यत त्यावर काही करता आले नाही.

परंतु वर्षातून येणाऱ्या सणाची किंवा कुठल्याही कामाची सुरवात श्रीगणेशाचे नाव घेऊन त्याला स्मरून होते अशा गणरायाला नदीत विसर्जन करायची प्रथा परंपरागत आहे,त्यात 75 % लोकानी शाडू मातीचे गणपती बाप्पा बसवले आहे,बरेचसे लोक हे घरीच टपात विसर्जन करून ते पाणी झाडांना टाकतात . जनतेलाही कळते की गोदावरी मातेचे पावित्र्य खराब होऊ द्याचे नाही.

कोरोना मुळे शासन / प्रशासन योग्य असा निर्णय घेत आहे , त्यास गावकरी यांनी 100 % सहकार्य केले आहे करत ही आहेत पुढेही करणार आहे.

या वर्षी कोरोना मूळे निश्चित शासनाने दिलेल्या नियमांचे गणपती विसर्जनाच्या बाबतीत पालन करून सहकार्य करणार आहोत. परंतु नगरपरीषद जे करायला पाहीजे तेज करता जनतेच्या भावनांशी खेळुन असा दुजाभाव करत आहे हे योग्य नाही , आमच्या श्रध्दा स्थान असलेल्या देवाच्या बाबतीत हे गप बसून काही बोलायचे नाही हे आम्हांला मान्य नाही,म्हणून बोलून या गोष्टीचा निषेध करणे हे तर नागरिक या नात्याने आमच्या हातात आहे असेही मंगेश पाटील शेवटी म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News