दिलीप डहाळे सर यांची रयत सेवक कुटुंब कल्याण योजना कार्यकारी मंडळाचा सदस्यपदी निवड !!


दिलीप डहाळे सर यांची रयत सेवक कुटुंब कल्याण योजना कार्यकारी मंडळाचा सदस्यपदी निवड !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री.ग.र औताडे माध्यमिक व ज्युनियर कॉलेजमधील विज्ञान शाखेचे शिक्षक दिलीप डहाळे सर यांची २०२१ते २०२३या कालावधीसाठी रयत सेवक कुटुंब कल्याण योजनेच्या कार्यकारी मंडळाचा सदस्यपदी नियुक्ती झाली आहे .

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या १८.७.२०२०रोजी भरलेल्या बैठकीतील ठरावा अर्तगत त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतीक क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेउन मंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड केली असुन त्याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे 

दिलिप डहाळे यांनी या अगोदर शारदा कन्या विद्यामंदीर रहाता येथे सेवेत असताना सलग चार वर्ष रहाता तालुका विज्ञान अध्यापक संघटनेचे अध्यक्ष म्हणुन काम पाहीले आहे.या दरम्यान त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतीक क्षेत्रातील भरीव  कामगिरीबद्दल २०१६-१७ या वर्षीचा राज्यस्तरीय राजर्षी शाहु महाराज आर्दश शिक्षक पुरस्कार तसेच २०१८चा महाराष्ट्र साहित्य परीषद यांचा उत्कृष्ट साहीत्यीक पुरस्कार त्याच वर्षी महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आर्दश शिक्षक पुरस्कार,तसेच २०१९मध्ये जागतिक मानवाधिकार संघटनेचा राष्ट्रीय सामाजिक पुरस्काराने डहाळे सर यांना गौरवण्यात आले होते. या सर्व क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेऊन रयत सेवक कुटुंब कल्याण योजनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य पदावर त्यांची नेमणुक करण्यात आली आहे.

दिलीप डहाळे सरांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी तसेच श्री.ग.र औताडे विद्यालयाचे प्राचार्य शिक्षकवृंद,कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक स्कुल कमिटी,सरपंच, तसेच पोहेगाव पंचक्रोशीतील नागरीकांनी डहाळे सर यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News