माळीवाडा येथे विशाल मंदिरात पोलिसांचे मॉक ड्रिल


माळीवाडा येथे विशाल मंदिरात पोलिसांचे मॉक ड्रिल

नगर- (प्रतिनिधि संजय सावंत) गणेश विसर्जन उद्या होत असून, शहर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यापार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहराचे ग्रामदैवत परिसरात मॉक ड्रिल केली. अचानक आलेली पोलिसांची वाहने, धावाधाव, शस्त्रधारी पोलिसांचे छुप्यापद्धतीने मंदिरात प्रवेश यामुळे बघ्यांची काहीशी गर्दी झाली होती. सुरूवातीला मंदिर परिसरात या प्रकाराची चर्चा सुरू झाली. त्यानंतर पोलिसांची ही उद्या गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर मॉक ड्रिल असल्याचे समजले. लाडक्या बाप्पाचे उद्या विसर्जन होत आहे. भाविकांच्या घरी जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेने देखील प्रशासकीय पातळीवर तयारी केली आहे. मोहरमच्या बंदोबस्तानंतर लगेच पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. कोरोनामुळे यावर्षी मिरवणुकांना परवानगी नाही. त्यामुळे साध्या पद्धतीनेच गणेश विसर्जन होणार आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी तसा ठराव करून दिला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडे नियोजनाचा असलेला ताण काहीसा कमी आहे. परंतु उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. असा असेल पोलिसांचा बंदोबस्त यंदा विसर्जन मिरवणूक नसली तरी पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात ठिकठिकाणी गस्तीपथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, ८ पोलीस निरीक्षक यांच्यासह ३०० कर्मचारी, एसआरपीचे तीन पथक, आरसीपीचे तीन पथक, बंदोबस्तकामी नियुक्त करण्यात आली आहे. विसर्जन ठिकाणी बॅरीकेटस् टाकून आतमध्ये कोणी येणार नाही, गर्दी होणार नाही याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले आहे. ड्रोन कॅमेर्‍याची नजर असणार आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News