जिल्हा पोलिस दलातर्फे महापद्मसेनेचा सन्मान!! महापद्मसेनेने समाज कार्य असेच सुरु ठेवावे-पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके


जिल्हा पोलिस दलातर्फे महापद्मसेनेचा सन्मान!! महापद्मसेनेने समाज कार्य असेच सुरु ठेवावे-पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके

 - पोलिस दलाच्यावतीने  पोलिस उपाधिक्षक  संदिप मिटके यांच्या हस्ते महापद्मसेनेचे उदय सुरम, विनोद बोगा यांना सन्मानपत्र देण्यात आले.

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) लॉकडाऊनच्या काळात जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग दिल्याबद्दल शहरातील महापद्मसेनेचा पोलिस दलाच्यावतीने सन्मान करण्यात आला. पोलिस उपअधिक्षक  संदिप मिटके यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी महापद्मसेनेचे पद्मसेवक उपस्थित होते. याप्रसंगी संदिप मिटके म्हणाले की, पोलिस दलातर्फे लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकीतून अन्न-धान्य, जेवणाचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. गरजू लोकांना फूड पॅकेट वेळेत पोहच करण्याचे काम विविध संस्थांनी केले. या उपक्रमात गरजवंतांना धान्य वाटप करुन सेवाभावी वृत्तीने काम केले. त्यांचे कार्य हे समाजासाठी दिशादर्शक व कौतुकास्पद असेच आहे. यापुढील काळातही असेच आपले सेवाभावी कार्य सुरु ठेवावे, असे आवाहन श्री.मिटके यांनी केले.

     महापद्मसेनेचे अमित बिल्ला यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे हाल होत असतांना महापद्मसेनेच्यावतीने गरजूंना मदतीचा हात म्हणून निराधरांसाठी मुठभर धान्य या उपक्रमांतर्गत शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने शहरातील विविध भागात निराधारांची यादी करुन 523 कुटूंबियांना धान्य वाटप करण्यात आले. तसेच त्यांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी पद्मसेवकांनी मदत केली. सेवाभावी वृत्तीने केलेल्या या उपक्रमाची पोलिस दलाने दखल घेऊन आमचा सर्वांचा जो सन्मान केला. त्यामुळे आमच्या कार्यास बळ मिळणार आहे, असे सांगितले.

     या उपक्रमासाठी महापद्मसेनेचे गणेश कुंदूर, संतोष मदनाल, अमोल अलवाल, राजू तेल्ला, ऋषीकेश कंदूर, आनंद येनगंदूल, निलेश बत्तुल, दर्शन येमुल, उमेश गंगुल, अक्षय दातरंगे, अमोल गाजेंगी, प्रविण शिरापुरी, विष्णू रायपेल्ली, प्रकाश कोटा, प्रशांत वैटला, रवि दंडी, ऋषी गालपेल्ली, अमोल येनगंदुल, राजेंद्र इगे, प्रविण बुरा, सागर इगे, विनोद बुरा, विनोद बोगा, आनंद गोंधळे, नरेश कोडम, सागर गोंधळे, अमोल दंडी, शशांक बोगा, महेश रोल्ला, हर्षद आडेप, रोहित येनगुपटला, अंकुश आडेप, संतोष येरला, गौतम बिज्जा, नरेश येलदी, शुभम गुरुड, आनंद दंडी, ओंकार कोडम, किरण वल्लाकट्टी, उदय सुरम, अमित बिल्ला, दिपक बुरला, विनीत बुरला, शंकर जिंदम, उमेश सुरम, निलेश गंगुल, सागर अरकल, शुभम बोल्ली, गणेश कोंडा, निकेतन मंचे आदिंसह पद्मसेवकांनी परिश्रम घेतले. पोलिस दलातर्फे झालेल्या सन्मानाबद्दल महापद्मसेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News