माळीवाडा तरुण मंडळ व सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने अर्बन बँकचे चेअरमन अनिलराव झोडगे यांचा सत्कार


माळीवाडा तरुण मंडळ व सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने अर्बन बँकचे चेअरमन अनिलराव झोडगे यांचा सत्कार

माळीवाडा तरुण मंडळ व सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने भिंगार बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जालिंदर बोरुडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  अध्यक्ष निलेश खरपुडे, उत्सव समिती प्रमुख छबूनाना जाधव, सतीन डागवाले, चंद्रकांत ताठे, सोनू भुतारे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, अशोक कापरे, नितीन शेरकर, बाळू पुंड, कैलास खरपुडे, नाथाजी राऊत, एकनाथ जाधव आदि. (छाया : राजु खरपुडे  

नगर - ( प्रतिनिधी संजय सावंत) माळीवाडा तरुण मंडळ व सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने भिंगार बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जालिंदर बोरुडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  अध्यक्ष निलेश खरपुडे, उत्सव समिती प्रमुख छबूनाना जाधव, सतीन डागवाले, चंद्रकांत ताठे, सोनू भुतारे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, अशोक कापरे, नितीन शेरकर, बाळू पुंड, कैलास खरपुडे, नाथाजी राऊत, एकनाथ जाधव आदि उपस्थित होते.

                 यावेळी अध्यक्ष निलेश खरपुडे म्हणाले, बँका, पतसंस्था या सर्वसामान्य, उद्योजक, कर्जदार, ठेवदार, सभासद यांच्या आधार ठरत असतात. चांगल्या आर्थिक संस्थांमुळे सर्वांचीच प्रगती होत असते. संचालक मंडळाच्या दुरदृष्टीने या संस्था प्रगतीपथावर राहत असते. असेच कार्य भिंगार बँकेचे नूतन चेअरमन अनिलराव झोडगे व संचालक मंडळ करत आहे. अनिलराव झोडगे यांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळेच त्यांची चेअरमनपदी निवड झाली आहे. या पदाला ते न्याय नक्कीच देतील. बँकेबरोबरच सर्वसामान्यांही उभे करण्याची भिंगार बँकेची परंपरा कायम ठेवतील,  असे गौरवोद्गार काढले.

     यावेळी उत्सव समिती प्रमुख छबूनाना जाधव म्हणाले, भिंगार बँक व संचालक मंडळावरील सर्वांचा विश्‍वास हेच बँकेच्या यशाचे गमक आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने बँक प्रगती करत आहे. अनिलराव झोडगे यांना चेअरमनपदाची मिळालेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन पार पााडतील.  त्यांच्या कार्यात आमचे सर्वांचे सहकार्य व प्रेम कायम राहिल, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी कैलास सुडके, अनिल चेडे, बाळासाहेब कानडे, दत्तात्रय भुतारे, जाधव आदि उपस्थित होते. शेवटी विष्णूपंत म्हस्के यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News