पुरूष हक्क संरक्षण समिती चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी ॲड शिवाजी अण्णा कराळे यांची फेरनिवड


पुरूष हक्क संरक्षण समिती चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी ॲड शिवाजी अण्णा कराळे यांची फेरनिवड

संजय सावंत अहमदनगर प्रतिनिधी:

पुरूषांच्या बरोबरच स्रियांच्या हक्काचे संरक्षणासाठी लढणा-या व कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून 1996 पासुन काम करणा-या पुरूष हक्क संरक्षण समिती च्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड शिवाजी अण्णा कराळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्याही नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. नाशिक येथे पुरूष हक्क समिती च्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्या बैठकीत पुरूष हक्क समिती च्या यापुर्वी झालेल्या 22 राज्यस्तरीय अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीय समिती चे अध्यक्ष डाॅक्टर सुनिल घाडगे आणि सचिव ॲड धर्मेंद्र चव्हाण यांनी अहमदनगर च्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड शिवाजी अण्णा कराळे यांची फेरनिवड केली आहे. ॲड शिवाजी अण्णा कराळे हे गेल्या वीस वर्षांपासुन पुरूष हक्क समिती मध्ये काम करत आहेत. ज्या प्रमाणे महिलांना संरक्षण मिळावे म्हणून अनेक कायदे निर्माण केले आहेत तसे कायदे पुरूषांना संरक्षण मिळावे म्हणून तयार केले नाहीत. त्यामुळे अनेक महिला सासुसासरे आणि नवरा व त्यांचे नातेवाईक यांचे विरूध्द पोटगी च्या केसेस, हुंडाबळीच्या केसेस, घरगुती छळ केला अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करतात आणि विनाकारण त्रास देतात. तसेच काही महिला विनाकारण पुरूषांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवून ब्लॅकमेल सुद्धा करतात. अशा परिस्थितीत पोलिस प्रशासन सुद्धा पुरुष मंडळींना सहकार्य करीत नाहीत. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन 1996 मध्ये नाशिक येथे पुरूष हक्क संरक्षण समितीची स्थापना केली आणि कायदेशीर त्याचे रजिस्ट्रेशन केले. सध्या महाराष्ट्रातील जवळपास तीस जिल्ह्यात संस्था कार्यरत असुन आता पर्यंत संघटनेचे 22 राज्यस्तरीय अधिवेशन झाले आहेत. अनेक पत्नी पिडीत पुरूषांना समीतीने कायदेविषयक मदत केली आहे.एवढेच नाही तर ज्या महिला भगिनींना पुरूषांनी विनाकारण त्रास दिला त्या महिला भगिनींना सुध्दा मदत केली आणि कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून प्रयत्न केले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पिडीत पुरूषांना ॲड शिवाजी अण्णा कराळे यांनी कायदेविषयक मदत केली आहे. लवकरच नोव्हेंबर 2020 मध्ये  समितीचे 23 वे अधिवेशन सोलापूर येथे होणार आहे. पुरूष हक्क समिती ला सुप्रसिद्ध प्रवचनकार ॲड कै.अपर्णाताई रामतिर्थकर यांनी खुपच मोलाचे सहकार्य केले आहे. दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्यां शनिवारी पत्नी पिडीत पुरूषांना कायदेविषयक मार्गदर्शन समिती चे वतीने केले जात आहे. ॲड शिवाजी अण्णा कराळे यांचे फेरनियुक्तती बद्दल अनेक मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे. 


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News