अबब दौंड ग्रामीण भागात कोरोनाचे वनडे अर्धशतक, पाटसला एकाच कुटुंबातील 9 जण बाधीत


अबब दौंड ग्रामीण भागात कोरोनाचे वनडे अर्धशतक, पाटसला एकाच कुटुंबातील 9 जण बाधीत

विठ्ठल होले पुणे

यवत प्रतिनिधी -- दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना ने कहर केला आहे,रविवारी घेतलेल्या स्वाब मध्ये तब्बल 51लोक कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटर  मध्ये 76 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 24 जणांचे अहवाल पोझिटीव आल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे.यामध्ये प्रामुख्याने पाटस येथील एकाच कुटुंबातील 9 व्यक्ती कोरोना बाधीत आल्याने पाटस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,यामध्ये कुरकुंभ - 10, पाटस - 11, अलेगावं - 2, वडगाव दरेकर - 1, यामध्ये पुरुष 16 तर महिला 8 आहेत, यवत कोविड सेंटर मधील 29/8/20 रोजी 82 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 27 लोकांचा अहवाल पोझिटीव आल्याची माहिती डॉ इरवाडकर यांनी दिली आहे,यामध्ये यवत -8, वाखारी - 5, बोरीपर्धी - 2, बोरीऐंदी -1, लडकत वाडी -4, सहजपुर -1,कोरेगाव भिवर -3, केडगाव -1, राहू -1,दौंड -1 असे 3 वर्ष ते 72 वर्ष वयोगटातील हे लोक आहेत,त्यामध्ये 16 पुरुष तर 11महिला आहेत,अशी माहिती डॉ इरवाडकर यांनी दिली आहे.ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे त्यामुळे जनतेनेच काळजी घ्यावी मास्क लावून च  घराबाहेर पडावे,स्वतः ची आणि कुटुंबाची काळजी स्वतः घ्या आरोग्य विभाग आपल्या सोबत आहे,परंतु जनतेचे सहकार्य मिळाले पाहिजे,शासनाने दिलेले नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन डॉ अशोक राजगे यांनी यावेळी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News