शिंगणापुर ग्रामपंचायतीचा वतीने आरोग्य केंद्रास थर्मलस्कॅनिंग मशिनचे वाटप !!


शिंगणापुर ग्रामपंचायतीचा वतीने आरोग्य केंद्रास थर्मलस्कॅनिंग मशिनचे वाटप !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोरोना संसर्गाचा पाश्र्वभुमीवर आरोग्य विभागाच्या वतीने  नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असुन,त्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे व कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महीला आमदार स्नेहलता कोल्हे यांचा मार्गदर्शनाखाली तसेच कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन

विवेकभैय्या कोल्हे यांचा सुचनेनुसार 

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर ग्रामपंचायतीने येथील आरोग्य केंद्रास सात थर्मल स्कॅनिंग मशिन दिले आहे.

मागिल काही दिवसापासुन कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे.ती नियंत्रणात यावी यासाठीआरोग्य विभागाने घरोघरी जाउन नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली असुन त्यासाठी लागणारे सात

थर्मलस्कॅनिंग मशिन सरपंच सुनिता भिमराव संवत्सरकर यांच्या उपस्थितीत शिंगणापुर आरोग्यवर्धिनी केंद्रात आरोग्य सेविका वंदना धनवटे,आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना देण्यात आले.

या प्रसंगी पंचायत समिती सदस्य सुनिता कैलास संवत्सरकर,अमृत संजीवनीचे संचालक जालिंदर आढाव,सरपंच सुनिता संवत्सरकर,उपसरपंच पुनमताई तुळसकर,काशिनाथ दादा लोणारी वि.वि.कार्यकारी सोसायटी चेअरमन राजेंद्र लोणारी,माजी सरपंच यादवराव संवत्सरकर माजी सरपंच कैलास चंद्रभान संवत्सरकर,माजी उपसरपंच जालींदर लगड, ग्रामपंचायत सदस्य बंटी गिते, संतोष विधाते कैलास संवंत्सकर

प्रमोद संवत्सरकर,शेखर कुऱ्हे, सुनिल शिंदे,विजय हाडके,डॉ काळे,उज्वला कुऱ्हे,सुनिल आढाव,काशिनाथ आढाव,वसंत थोरात, समाधान कुटे, रविंद्र लगड,तसेच भिमराव संवत्सरकर, ग्रामविकास अधिकारी श्री शिंदे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी सरपंच यादवराव संवत्सर म्हणाले कि      कोरोना महामारीच्या काळात संजीवनी उद्योग समूहाने बिपीनदादा कोल्हे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रथम महीला आमदार स्नेहनता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांच्या कल्पकतेतुन अनेक स्तुत्य उपक्रम राबविले असुन या संकटकाळत आपल्या सर्वांच्या मागे खंबीर उभे राहीले असुन त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनही केल्याचे हि त्यांनी सांगितले. नागरीकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

आजच्या या उपक्रमाचे शिंगणापुर पंचक्रोशीतील नागरीकांनी कौतुक केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News