बाळासाहेब शिंदे यांनी खंडेश्वरास अर्पण केला अर्धा किलो चांदीचा मुकुट.


बाळासाहेब शिंदे यांनी खंडेश्वरास अर्पण केला अर्धा किलो चांदीचा मुकुट.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी:  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील खंडेश्वर देवस्थान मंदिरावर बाळासाहेब शिंदे व कुटुंबाची श्रद्धा आहे. त्यांनी श्रद्धेपोटी रविवारी अर्धा किलो चांदीचा मुकुट अर्पण केला. प्रदीपकाका एडके यांच्या हस्ते पूजा करून हा मुकुट ग्रामस्थांनी देवस्थानाला सुपूर्द केला. त्यांच्या दानशूरपणाला प्रतिसाद देत येळपणे ग्रामस्थांच्या वतीने शिंदे परिवाराचा सत्कार करण्यात आला.तसेच मंदिरातील जुना तांदळा दर्शनोयुक्त तयार व्हावा व त्यासाठी लागणारा खर्च ते देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

           यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर, कुकडी साखर संचालक आबा पाटील पवार, उपसरपंच गणेश पवार, सुनील लोखंडे, सुभाष पवार,काशीनाथ धावडे, संजय पवार,संतोष डफळ, तुकाराम खामकर, आनंदा खामकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News