श्रीगोंदा तालुक्यात रविवारी खाजगी चाचण्यांत ९ जण संक्रमित.


श्रीगोंदा तालुक्यात रविवारी खाजगी चाचण्यांत ९ जण संक्रमित.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी दि.३०: श्रीगोंदा तालुका आरोग्य विभागाकडील दि.२९ ऑगस्ट पासून रॅपिड अँटीजन किट संपल्यामूळे चाचणीसाठी येणाऱ्या व्यक्तींचे घशातील स्राव घेऊन नगरला पाठविण्यात येत आहेत. दि २९ ला ३८ जणांचे स्राव घेण्यात आले त्यांचे अहवाल दि. ३१ रोजी मिळण्याची शक्यता आहे तर रविवार दि. ३० रोजी ३० जणांचे स्राव घेऊन नगरला पाठवले आहेत.

            दि.३० रोजी काही व्यक्तींनी श्रीगोंदा,दौंड व काही बाहेरील तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचण्या घेतल्या त्यात ९ जण संक्रमित आढळले. श्रीगोंदा शहरात मेनरोड-४, काळकाई चौक -१, शाहूनगर-१ तर ग्रामीण भागात पेडगाव-१, ढोकराई-१, पिंप्री कोलंदर-१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या ७९५ झाली आहे. दि.३० रोजी २३ जण बरे होऊन घरी परतले.एकूण बरे झालेले रुग्ण ७२८ आहेत. सद्यस्थितीला कोविड केंद्रात २४ जण उपचार घेत आहेत. तर इतर ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये १८ जण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २५ जणांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News