राष्ट्रसंत भजलींग तैल चित्र अनावरण सोहळा निमित्त अकोले उर्दू शाळेस स्मार्ट टिव्ही सप्रेम भेट


राष्ट्रसंत भजलींग तैल चित्र अनावरण सोहळा निमित्त अकोले उर्दू शाळेस स्मार्ट टिव्ही सप्रेम भेट

राज मोहम्मद शेख प्रतिनिधी:

संगमनेर:- राष्ट्रीय संत भोजलिंग तैल चित्र अनावरण सोहळा निमित्त मा.रवींद्र रायकर, ( अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ ) मावळ तालुका अध्यक्ष आणि बाळा साहेब गराडे पंचायत सदस्य जांभूळ, ता.मावळ संत भोजलींग सत्यशोधक समितिकडून जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा अकोले, ता.अकोले, या शाळेस स्मार्ट टी व्ही भेट दिला.

या प्रसंगी मा.विधान परिषदेचे आमदार डॉ.सुधीर तांबे साहेब, यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये संपन्न झाला, प्रसंगी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अर्शद भाई तांबोळी,मन्सूर भाई सय्यद, शाहीद भाई पठाण,गट शिक्षणधिकारी कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शना खाली तसेच विस्तार अधिकारी खताळ साहेब, व केंद्र प्रमुख वाकचौरे साहेब याच्या मार्गदर्शन खाली मुख्यध्यापिका शेख समिना इसहाक शेख, जि. प.प्रा.उर्दू शाळा, तसेच मान्यवर मा. सुरेशजी भालेराव, मा. विनायकजी सुतार, मा. संजयजी भालेराव, मा. विरेंद्रजी भालेराव, मा. संतोषजी कदम यांचे उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू जी गरुड साहेब पुणे हे होते, सूत्र संचालन कदम सर यांनी केले प्रस्ताविक संजय जी भालेराव हे होते.महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास सोशल डीस्टांस चे पालन करीत हजर होते.कार्यक्रमाचे आयोजक अनिल भाऊ सोमवंशी व त्यांचे सहकारी होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News