बहाद्दरांनी 30 लाख लुटले; पण पोलिसांनी दहा तासांतच त्यांना जेरबंद केले


बहाद्दरांनी 30 लाख लुटले; पण पोलिसांनी दहा तासांतच त्यांना जेरबंद केले

विठ्ठल होले पुणे

कुरकुंभ, ता. 30 : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे दोन दुचाकीवरून आलेल्या पाच चोरटयांनी टेंम्पोतील 30 लाख रूपये लुटल्याप्रकरणातील पोलिसांना दहा तासात एका आरोपीसह, 10 लाख रूपये व एक दुचाकी ताब्यात घेण्यात यश आले.

मळद येथील वृंदावन हाॅटेलजवळ शनिवारी ( ता. 29 ) रात्री आठ वाजता महामार्गावरून सोलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोतून दोन काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच चोरटयांनी 30 लाख रूपये पळविली होते. याबाबत दौंड व यवत पोलिसांनी सुरक्षायंत्रणेवर त्वरित माहिती देऊन मदतीचे आवाहन केले.त्यामुळे ग्रामस्थ व ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले. पाटस येथील ग्रामस्थ राहील तांबोळी यांच्या सांगण्यावरून  पाटस - बारामती रस्त्यालगत एक दुचाकी व 8 लाख 20 हजार रूपये रोकड सापडली. रविवारी ( ता. 30 ) पहाटे पोलिस हवालदार बाळासाहेब पानसरे व पोलिस मित्र सोनबा देशमुख यांना पाटस टोलनाक्यावरील एका हाॅटेलमध्ये एक संशयित आरोपी प्रकाश पांडुरंग गोरगल (वय 36, रा. वाखारी, ता. दौंड  ) याला व त्याच्याकडील 2 लाख 10 हजार रूपयाची रोकड ताब्यात घेतली. असे पाटस पोलिसांनी दहा तासात एक दुचाकी, दहा लाख 30 हजार रूपये व एका आरोपीला अटक करण्यात यश आले. तर उर्वरित चार आरोपी व पैशाचा तपास चालू आहे. अटक करण्यात आलेला आरोपी व मुद्देमाल दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News