भीम आर्मीच्या लढ्याला यश... स्वाधार योजने अंतर्गत लाखो विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदानाची रक्कम..उत्तरेश्वर कांबळे


भीम आर्मीच्या लढ्याला यश...   स्वाधार योजने अंतर्गत लाखो विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदानाची रक्कम..उत्तरेश्वर कांबळे

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

इ.11वी 12 वी आणी त्यानंतर व्यावसायिक अभ्यास क्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या परंतू कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ह्यापूर्वी ह्या विद्यार्थ्यांना भोजन,निवास आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून थेट अनुदान उपलब्ध करून देणा-या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016/2017 पासुन सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली होती. परंतु आजपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाने संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम जमा केली जात नव्हती. त्यामुळे जे विद्यार्थी बाहेर गावी शिकतात त्यांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सदर विद्यार्थ्यांना थकीत घरभाडे, खानावळी इत्यादी खर्च देण्यासाठी अनेक डचणी येत होत्या .विद्यार्थ्यांच्या ह्याच अडचणी लक्षात घेऊन संबंधित खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रभरातून भीम आर्मीच्या वतीने निवेदने देण्यात आली.

इतकेच नव्हे तर याच प्रश्नांवर भीम आर्मी व भीम आर्मी स्टूडट फेडरेशन यांच्यासह महाराष्ट्रातील आंबेडकरी संघटनांनी सोशल मिडियावर हॅशटॅग चालवून मोठे आंदोलन केले .संविधान रक्षक अॅड.भाई चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या आदेशानुसार आणी भीम आर्मीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 

उर्जा मंत्री डाॅ.नितिन राऊत तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांस मंत्रालयात भेटून निवेदन दिले होते. राज्यात सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व पदाधिका-यांनी आप आपल्या विभागातील जिल्हाधिकारी ,तहसीलदार यांना निवेदने दिली. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांना लढलेल्या सामुहिक लढ्याला यश मिळाले असुन शासनाने परिपत्रक जारी करून स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम त्वरीत टाकण्याचे आदेश दिले असुन महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी स्वागत केले आहे. 

यापुढेही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढा देऊन .त्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊ असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News