हिंगणी ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य तपासणी मोहीम !!


हिंगणी ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य तपासणी मोहीम !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील हिंगणी गावात माजी आमदार स्नेहलताई कोल्हे व कोपरगावचे युवा नेतृत्व विवेक भैय्या यांचा मार्गदर्शनाने दि.३०ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतचा वतीने सरपंच जिजाबाई जयवंत पवार यांच्या उपस्थितीत गावातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोपरगाव तसेच ग्रामिण भागात कोरोना बाधीतांचे आकडे वाढत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या काळात कोपरगावात प्रशासन तसेच आरोग्य विभागाचा वतीने कोरोना जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे तसेच आरोग्य तपासणी मोहीमा राबविण्यात येतअसुन कोरोनाला नागरीकांपासुन दुर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

या पाश्वभुमीवर ग्रामस्थांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रार्दभाव वाढु नये यासाठी हिंगणी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने गावातील नागरीकांची घरोघरी जाउन आरोग्य तपासणी करण्यात आली. या मोहीमेत अंगणवाडी सेविका, आशा सेविका व सरपंच जिजाबाई जयवंत पवार उपस्थित होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News