इंदापूर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी पाच कोटीची तरतूद - हनुमंत बंडगर


इंदापूर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी पाच कोटीची तरतूद - हनुमंत बंडगर

नानासाहेब  मारकड भिगवण ( प्रतिनिधी) 

इंदापुर तालुक्यातील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण करुन उजनीतुन  शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यामध्ये पाणि सोडुन इंदापूर तालुक्यातील लाभ क्षेत्रासाठी खडकवासला कालव्याद्वारे पाणी देण्याची योजना व निरा डावा कालवा योजनेचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्यशासनाने तात्काळ ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली. 

      योजना मार्गी लावण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा केला असुन यावेळी बैठकीला मंत्री जयंत पाटील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे खासदार सुप्रिया सुळे तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील अभिजीत तांबिले राष्ट्रवादाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे आदी उपस्थित होते. 

      त्याचप्रमाणे कालवा व सर्व वितरकांचे दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.निरा डावा मूळ कालवा पूर्णपणे नव्याने वाढीव वहन क्षमतेचा करण्याचा सर्वे करून कालवा अस्तरीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे अंदाजपत्रक तात्काळ शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावे.शेटफळ हवेली तलावाची राहिलेली अपुर्ण उंची वाढवण्याचे काम व सांडवा वितरीकेचे अपूर्ण काम करण्याचे आदेश देण्यात आले.

       लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे 5600 हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्वे करण्याचे आदेश देणेत आले.टाटा कंपनीच्या ताब्यात असणाऱ्या मुळशी धरणातून दहा टीएमसी पाणी पुणे शहरासाठी वाढीव लोकसंख्या लक्षात घेता नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

        महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये काम करताना राज्यासह तालुकाच्या विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्नशील असेल. तालुक्याचा सर्वात महत्वाचा  विषय मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही दत्तात्रय भरणे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News