कुरकुंभ आणि पाटस येथील रुग्णांच्या संख्येत वाढच होते आहे,जनतेने घाबरून जाऊ नये,काळजी घ्यावी -- डॉ अशोक राजगे


कुरकुंभ आणि पाटस येथील रुग्णांच्या संख्येत वाढच होते आहे,जनतेने घाबरून जाऊ नये,काळजी घ्यावी -- डॉ अशोक राजगे

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कुरकुंभ आणि पाटस ही गावे आघाडीवर आहेत,ही दोन्ही गावे पुणे सोलापूर हायवे शेजारी असल्या कारणाने येथे वर्दळ जास्त आहे त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

28/8/2020 रोजी दौंडच्या ग्रामीण भागातील 40 नागरिकांचे घशातील स्त्राव तापणीसाठी नेले असता आज त्यातील 12 नागरिक पोजिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली.पाटस-7,कुरकुंभ-1,रावनगाव-3,केडगाव-1 हे सर्व रुग्ण 12 ते  74 वर्ष वयोगटातील आहेत अशी माहिती डॉ अशोक राजगे यांनी दिली.हे स्वामी चिंचोली येथील अहवाल आहेत.यावेळी डॉ राजगे यांनी जनतेला आवाहन केले आहे की आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,विना मास्क कोणीही फिरू नये,सर्वांनी स्वतः ची व कुटुंबाची काळजी घ्यावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News